Pakistan: कराचीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू; इमारतीतील वीज खंडित
Fire (PC - File Image)

Pakistan: पाकिस्तान (Pakistan) च्या कराची (Karachi) शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) शनिवारी भीषण आग (Fire) लागून किमान 11 जण ठार तर सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी सातच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीने शॉपिंग मॉलच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यालाही वेढले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि इमारतीमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 42 लोकांना वाचवण्यासाठी 12 अग्निशमन दल, एक स्नॉर्कल आणि सुमारे 50 अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

मुख्य अग्निशमन अधिकारी मुबीन अहमद यांनी सांगितले की, आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. बहुतेक मृत्यू धुरामुळे आणि घाबरल्यामुळे झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इमारतीतील वीज खंडित करावी लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आमची टीम अजूनही इमारतीत अडकलेल्यांचा शोध घेत आहे, परंतु आम्ही 42 लोकांना वाचवले. जे सर्व पुरुष होते, जे आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली तेव्हा उपस्थित होते. कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनी या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, परंतु पोलीस अधिकारी सुमया सय्यद यांनी सांगितले की, आतापर्यंत 11 मृतदेह दोन रुग्णालयात आणण्यात आले आहेत. (हेही वाचा - Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांचा युद्धविराम; गाझामधील मृतांची संख्या 14,800 हून अधिक)

दरम्यान, नऊ जणांना जिना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तर इतर दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. मुबीन म्हणाले की ते अद्याप आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.

सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी (SBCA) सारख्या नियामक संस्थांच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे महानगरातील लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. या भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजा तारिक यांनी सांगितले की, ही इमारत एक व्यापारी बहुमजली इमारत असून त्यात शॉपिंग सेंटर, कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअर हाऊस आहे.

अग्निशमन आणि बचाव दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तारिकने सांगितले की, मागच्या वर्षीही याच मॉलमध्ये छोटी आग लागली होती, मात्र ती लगेच आटोक्यात आली होती.