सिंध येथे अल्पवयीन हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करुन लग्न, लंडनच्या संयुक्त राष्ट्र कार्यालयाबाहेर भारतीयांकडून आंदोलन
Protest in London (Photo Credits-ANI)

पाकिस्तान (Pakistan) मधील सिंध येथे एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या मुलीला इस्लामिक धर्मात परिवर्तन करत तिचे मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न सुद्धा लावून दिले आहे. याच कारणास्तव आता लंडनच्या संयुक्त कार्यालयाबाहेर भारतीयांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी सुद्धा सिंध येथे मुलींचे अपहरण करत त्यांचे लग्न लावून दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर पुन्हा आता तसाच घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मेहक कुमारी असे हिंदू अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मेहक हिला धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करत तिचे मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न लावून दिले. यामुळे भारतीय नागरिकांकडून लंडनच्या संयुक्त राष्ट्राच्या कार्यालहाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांना मेहक हिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मागितला आहे. एवढेच नाही तर पोस्टरवर Stand Up for Human Rights आणि Stop Child Abuse in Pakistan असे पोस्टर आंदोलकांकडून झळकावण्यात आले आहेत.(धर्म परिवर्तन थांबवण्यासाठी नवा कायदा लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार)

यापूर्वीसुद्धा सिंधमधीलच इस्लाम कोट येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे एका व्यक्तीसोबत बळजबरीने लग्न लावून देण्यात आले होते. तसेच कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचे सुद्धा भररस्त्यातून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. लाहौर येथे ननकाना साहिब क्षेत्र येथे एका शीख धर्मातील मुलीवर बंदूक धरुन तिला धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही तर धर्मपरिवर्तन केल्यानंतर या मुलीचे जबरदस्तीने लग्न सुद्धा लावून देण्यात आले होते. पाकिस्तान मध्ये मुलींच्या बाबत सुरु असलेल्या अशा प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात आला होता. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या वागण्यावर जहरी टीका करण्यात आली होती.