Blaze erupts in electrical substation in London (Photo Credits: X/@JayinKyiv)

लंडन च्या Heathrow Airport जवळ असलेल्या इलेक्ट्रिकल सबस्टेशन जवळ भीषण आग लागल्यानंतर आता दिवसभरासाठी लंडनचं सर्वात जास्त वर्दळीचं एअरपोर्ट बंद राहणार आहे. या आगीमुळे आणि वीजपुरवठा खंडीत झाल्याने सध्या अनेक प्रवासी रखडले आहेत.21 मार्चच्या सकाळपासून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. आता लंडनच्या स्थानिक वेळेनुसार, रात्री 23.59 पर्यंत विमानतळ बंदचं ठेवले जाणार आहे. अशी माहिती Heathrow officials कडून देण्यात आली आहे.

लंडन मध्ये सध्या हजारो घरांमध्ये वीज नाही. तर 150 जणांना या आगीमुळे घरं सोडावं लागलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 फायर इंजिन्स आणि 70 फायर फायटर्स आहेत. सध्या आगीचं कारण अज्ञात आहे.

लंडन ला जाणारी Air India Flights रद्द

Air India कडून सध्या फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. आगीमुळे AI129 हे एअर इंडियाचे मुंबई-लंडन फ्लाईट माघारी फिरलं आहे. AI161 हे दिल्ली-लंडन फ्लाईट जर्मनीमध्ये Frankfurt ला वळवण्यात आले आहे. अन्य 21 मार्चची लंडनची Heathrow Airport ची विमानं रद्द करण्यात आली आहेत. तर लंडन मधील Gatwick ची विमानं सुरळीत चालवली जाणार आहेत.

दरम्यान विमानतळ सुरू झाल्याची माहिती मिळताच स्थगित विमानांची पुढील माहिती दिली जाणार आहे.

Flightradar24, च्या माहितीनुसार 1351 विमानं आज Heathrow विमानतळावरील आगीमुळे विस्कळीत झाली आहेत. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, Qantas Airways आणि United Airlines सह इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही पॅरिस आणि Shannon सारख्या पर्यायी युरोपीय विमानतळांवर त्यांचे विमान मार्ग बदलण्यास भाग पाडण्यात आले आहे.