Grammy Awards 2021: ग्रॅमी अवार्डमध्ये प्रसिद्ध गायक बियांसेने बनवला नवा विक्रम; पहा यंदाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी
Grammy Award 2021 (PC - Wikimedia Commons)

Grammy Awards 2021: यंदा संगीत क्षेत्रातील सर्वोत लोकप्रिय ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. कोरोना साथीच्या आजारामुळे हा पुरस्कार कार्यक्रम या वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्यात आला होता. यावर्षी 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन 31 जानेवारी रोजी होणार होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम 14 मार्च रोजी घेण्यात आला. रविवारी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. यावेळी या पुरस्कार सोहळ्याचे संचलन प्रख्यात कॉमेडियन आणि टॉक शो होस्ट ट्रेवर नोआह यांनी केलं.

दरवर्षी प्रमाणे, 63 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये काही नवीन गायक आणि गाण्यांनी आपले स्थान टिकवत हा प्रसिद्ध गायन पुरस्कार मिळवला. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक बियांसेने 28 व्या वेळी हा पुरस्कार जिंकला आहे. चला तर मग यावर्षीच्या ग्रॅमी पुरस्काराची संपूर्ण यादी जाणून घेऊयात... (वाचा - Happy Birthday Alia Bhatt: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या 6 व्या वर्षी केलं होत 'संघर्ष' चित्रपटात काम; रणबीर कपूरच्या आधी 'या' अभिनेत्याशी जोडण्यात आलं नाव)

ग्रॅमी पुसस्कार विजेत्यांची यादी - 

 • बेस्ट म्यूजिक व्हिडिओ- ब्राउन स्किन गर्ल, बियांसे विद ब्लू इवी
 • बेस्ट रॅप अल्बम- किंग्स डिजिज, नास
 • बेस्ट म्यूजिक फिल्म- लिंटा रोन्सटाड- द साउंड ऑफ माई वायस, सिंटा रोन्सटाड
 • बेस्ट रॉक अल्बम- द न्यू एबनॉर्मल, द स्ट्रोक्स
 • बेस्ट कंट्री अल्बम- वाइल्ड कार्ड, मिरांडा लॅम्बर्ट
 • बेस्ट न्यू आर्टिस्ट- मेगन थी स्टेलियन
 • बेस्ट रिदम एंड ब्लूज- ब्लॅक परेड, बियांसे
 • बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस- वाटरमेलन शुगर, हॅरी स्टाइल्स
 • बेस्ट ट्रेडिशनल पॉप वोकल अल्बम- अमेरिकन स्टँडर्ड, जेम्स टेलर
 • बेस्ट अल्टरनेटिव म्यूजिक अल्बम- फेच द बोल्ट कटर्स, फियोना एप्पल
 • बेस्ट डांस/इलेक्ट्रॉनिक अल्बम- बुब्बा, केट्रानाडा
 • बेस्ट जॅज वोकलल अल्बम- सिक्रेट्स आर द बेस्ट स्टोरीज, कर्ट एलिंग फीचरिंग डेनिलो पेरेज
 • बेस्ट अल्टरनेटिव म्यूजिक अल्बम- फेच द बोल्ट कटर्स, फियोना एप्पल
 • बेस्ट प्रोग्रेसिव आर एंड बी अल्बम- इट इज व्हाट इट इज, थंडरकँट
 • बेस्ट जॅज इंस्ट्रूमेंटल अल्बम- ट्राइलॉजी 2, चिक कोरिया, क्रिस्टियन मॅकब्राइड आणि ब्रायन ब्लेड
 • बेस्ट स्पोकेन वर्ड अल्बम- ब्लोआउट- करप्टेड डेमोक्रेसी, रोग स्टेट रशिया, आणि द रिचेस्ट, मोस्ट डिस्ट्रक्टिव इंडस्ट्री ऑन अर्थ, रशेल मॅडो
 • बेस्ट कंटेम्पररी क्रिस्टियन म्यूजिक अल्बम- जीसस इज किंग, कानये वेस्ट
 • बेस्ट कॉमेडी अल्बम- ब्लॅक मित्जवाह, टिफनी हॅडिश
 • प्रोड्यूसर ऑफ द ईयर, नॉन क्लासिकल- एंड्रयू वाट
 • बेस्ट स्कोर साउंडट्रॅक फॉर विजुअल मीडिया- जोकर
 • बेस्ट कॉम्पिलेशन साउंडट्रॅक फॉर विजुअल मीडिया- जोजो रॅबिट

  सॉन्ग ऑफ द ईयर (सॉन्ग राइटर्स अवॉर्ड)- आई कान्ट ब्रीद, एचईआर, डर्न्सट एमिली II आणि टियारा थॉमस

रविवारी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 63 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कोरोना विषाणू संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ग्रॅमी पुरस्करा सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.