एका फ्रेंच महिलेने (French Woman) तिच्या मालकावर 20 वर्षांपासून कोणतेही काम न देता पूर्ण पगार दिल्याबद्दल खटला दाखल केला आहे. व्हीएन एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार, अपंग असलेल्या लॉरेन्स व्हॅन वॉसेनहोव्हने (Laurence Van Wassenhove) दूरसंचार कंपनी ऑरेंजवर दावा दाखल केला आहे. तिने तिच्या शारीरिक स्थिती, आरोग्य यांवर आधारीत आधारित छळ आणि भेदभावाचा आरोप कंपनीवर केला आहे. ऑरेंजने (Orange) कंपनी ताब्यात घेण्यापूर्वी 1993 मध्ये व्हॅन वासेनहोव्ह यांना फ्रान्स टेलिकॉमने (France Telecom) नियुक्त केले होते. तिला अर्धांगवायू झाला होता आणि शारीरिक मर्यांदांनाही तिला तोंड द्यावे लागत होते. अशा वेळी कंपनीने तिला वेगळी जबाबदारी दिली. तिने 2002 पर्यंत सेक्रेटरी आणि मानवी संसाधनांमध्ये काम केले. मात्र, तिने आपली बदली फ्रान्समधील दुसऱ्या प्रदेशात व्हावी अशी विनंती कंपनीकडे केली. मात्र, नव्या ठिकाणी वातावरण आणि भौगोलिक अडचणी असल्याने कंपनीने तिला कामाचे ठिकाण बदलून दिले नाही.
काम न करता मोबदला घेणे अपमानकारक
लॉरेन्स व्हॅन वॉसेनहोव्ह हिस कंपनीने कामाचे ठिकाण बदलून दिले नसले तरी, तिला पगार मात्र पूर्ण दिला. कंपनीने जवळपास 20 वर्षे तिला पगार दिला. महिलेने दावा करत कंपनीवर आरोप केला आहे की, संस्थेने तिला कामावरुन काढून टाकण्यासाठीच असे केले आहे. याबाबत बोलताना ही महिला कर्मचारी सांगते की, "कोणतेही काम न करण्यासाठी मोबदला मिळणे हे अनेकांना स्वप्नवत वाटू शकते. परंतु ते सहन करणे खूप कठीण आहे." द सनने दिलेल्या वृत्तानुसार. 2015 मध्ये, तिने भेदभावाविरुद्ध लढा देण्यासाठी सरकार आणि उच्च प्राधिकरणाकडे तक्रार केली. ऑरेंजने मध्यस्थ नियुक्त केले, परंतु व्हॅन वासेनहॉव्हने दावा केला की तिची परिस्थिती सुधारली नाही. (हेही वाचा, 'Apple कंपनीने मला समलैंगिक बनवले'; iPhone मुळे Gay बनलेल्या व्यक्तीने दाखल केला 11 लाखाचा गुन्हा)
काम न करणे हा विशेषाधिकार नाही
तिचे वकील, डेव्हिड नाबेट-मार्टिन यांनी असे प्रतिपादन केले की, दीर्घकाळ अलग राहणे आणि कामाचा अभाव यामुळे तिला नैराश्य येत होते. "घरी पगार मिळणे, काम न करणे हा विशेषाधिकार नाही. हे सहन करणे खूप कठीण आहे," यावर त्यांनी जोर दिला. महिलेच्या वकिलाच्या दाव्याला दिलेल्या प्रतिसादात, ऑरेंजने सांगितले की, व्हॅन वासेनहॉव्हने तिची "वैयक्तिक सामाजिक परिस्थिती" लक्षात घेऊन सर्वोत्तम परिस्थितीत काम केले आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व केले आहे. कंपनीने दावा केला आहे की तिने तिच्यासाठी "अनुकूल स्थितीत कामावर परत जा" धोरणाची योजना आखली होती, पण ती वारंवार आजारी असल्याने ती कधीच पूर्ण झाली नाही.