Close
Search

Hinduja Family Members Sentenced: घरकामगारांचे शोषण केल्याप्रकरणी अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना 4.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने आपल्या आदेशात हिंदुजा कुटुंबातील सदस्य कामगारांचे शोषण करून त्यांना तुटपुंजे आरोग्य लाभ देण्यास दोषी असल्याचे म्हटले आहे.

Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ
Close
Search

Hinduja Family Members Sentenced: घरकामगारांचे शोषण केल्याप्रकरणी अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना 4.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने आपल्या आदेशात हिंदुजा कुटुंबातील सदस्य कामगारांचे शोषण करून त्यांना तुटपुंजे आरोग्य लाभ देण्यास दोषी असल्याचे म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय Bhakti Aghav|
Hinduja Family Members Sentenced: घरकामगारांचे शोषण केल्याप्रकरणी अब्जाधीश हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांना 4.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Law gavel lights प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Hinduja Family Members Sentenced: स्विस फौजदारी न्यायालयाने (Swiss Criminal Court) शुक्रवारी हिंदुजा कुटुंबातील (Hinduja Family) चार जणांना नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी (Exploiting Domestic Workers) साडेचार वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment Sentence) सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने मानवी तस्करीचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल यांना प्रत्येकी 45 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा मुलगा अजय आणि त्याची पत्नी नम्रता यांना प्रत्येकी चार वर्षांची शिक्षा झाली आहे. या आदेशाविरुद्ध चारही आरोपी उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

स्वित्झर्लंडच्या न्यायालयाने आपल्या आदेशात हिंदुजा कुटुंबातील सदस्य कामगारांचे शोषण करून त्यांना तुटपुंजे आरोग्य लाभ देण्यास दोषी असल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन स्वित्झर्लंडमधील अशा नोकऱ्यांच्या पगाराच्या दहाव्या भागापेक्षा कमी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मात्र, कर्मचाऱ्यांना आपण काय करत आहोत याची माहिती असल्याचे सांगत न्यायालयाने तस्करीचे आरोप फेटाळून लावले. (हेही वाचा - Child Food Poverty: जगातील प्रत्येक चौथ्या मुलाला मिळत नाही पोषक आहार; बाल अन्न गरिबीबाबत भारताची स्थिती अत्यंत गंभीर, UNICEF च्या अहवालात खुलासा)

ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाने कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा त्यांच्या कुत्र्यावर जास्त खर्च केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याशिवाय, कर्मचाऱ्यांना स्विस फ्रँक नव्हे तर रुपयांत पगार दिला जात होता. हिंदुजा कुटुंबातील चार सदस्यांनी कामगारांना व्हिला सोडण्यास मनाई केली आणि त्यांना बरेच तास काम करण्यास भाग पाडले. किंबहुना, अनेक प्रसंगी, कर्मचाऱ्यांना दिवसातून 18 तास काम करण्याची सक्ती केली जात असे. भारतात मूळ असलेल्या या कुटुंबाने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्य केले.

हिंदुजांचे माहिती तंत्रज्ञान, मीडिया, पॉवर, रिअल इस्टेट आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रात व्यवसाय आहेत. फोर्ब्सनुसार, हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 20 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change