प्रियंका चोप्रा (File Image: IANS)

फोर्ब्स इंडिया (Forbes India) ने ‘डब्ल्यू-पॉवर ट्रेलब्लाझर्स 2019' (W-Power Trailblazers 2019) लिस्ट प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये अशा महिलांना स्थान देण्यात आले आहे, ज्यांनी परंपरागत चालत आलेल्या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये आपली स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. या यादीमध्ये समाजसुधारक, आर्किटेक्ट, खेळाडू, नेता, वकील, व्यावसायिक अशा क्षेत्रामधील महिलांची नावे समविष्ट आहेत. फोर्ब्स इंडियाचे संपादक ब्रायन कारवाल्हो (Brian Carvalho) यावेळी म्हणाले, ‘ज्या महिलांची बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, ज्या त्यासाठी प्रयत्न करतात, आणि ज्यांनी ते घडवून आणले आहे अशा स्त्रियांचा सन्मान या यादीद्वारे करण्यात आला आहे’. पाहा या यादीमध्ये स्थान मिळालेल्या महिलांची यादी

प्रियंका चोप्रा जोनस – प्रियंकाने सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रियंकाने कोडींग एजुकेशन कंपनी हेलबर्टन स्कूलसोबत डेटिंग आणि सोशल मीडिया अॅप बंबलमध्ये गुंतवणूक केली आहे. हॅल्बर्टन स्कूलच्या मिशन टेक्निकल स्पेसमध्ये प्रियंका इन्व्हेस्टर म्हणून जोडली गेली आहे. मनोरंजन क्षेत्रातही प्रियंकाने आपले नाव कमावले आहे.

मेरीकॉम - 2018 मध्ये सहाव्यांदा विश्व चॅम्पियनशिप जिंकून तिने स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. (हेही वाचा: सर्वात श्रीमंत महिला अभिनेत्रींमध्ये Deepika Padukone ठरली अव्वल; जाणून घ्या 2018 मधील तिची कमाई)

कोमल मंगतानी – कोमल अमेरिकन कंपनी ‘उबर’ची अभियांत्रिकी आणि व्यवसाय इंटेलिजन्सची प्रमुख आहे. कस्टमर सर्व्हिससोबत, कंपनीच्या 7.5 अब्ज डॉलर्स (52,500 कोटी रुपये) कमाईसाठीही ती स्ट्रॅटेजी बनवते.

भक्ति शर्मा - अटलांटिकमधील थंड पाण्यात पोहणारी जगातील सर्वांत तरुणी

सीमा भट - होमलँड फॅशन आणि लाइफस्टाइलच्या तीन संस्थापकांपैकी एक. शाका आणि सिपिका भाट हे होमलँड फॅशन आणि लाइफस्टाइलचे इतर दोन संस्थापक आहेत.

सुभद्रा द्रविड़ – या ट्रांससेल बायोलॉजिकलच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत

मेनका गुरुस्वामी - गुरुस्वामी सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. त्या बऱ्याच काळापासून मानवाधिकारांसाठी काम करत आहेत. कलम 377 साठी लढणाऱ्या त्या एकमेव महिला वकील होत्या.

विनती सराफ मुत्रेजा - विनती यांनी न्यूयॉर्क येथील कन्सल्टिंग फर्म मर्सर ओलिव्हर वायमनसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे, जी कंपनी वित्तीय सेवा आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये काम करते.