ब्राझील देशातील काँग्रेसच्या माजी महिला पुढारी फ्लोरालिस डॉस सैंटोस (Flordelis dos Santos) हिला तब्बल 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फ्लोरालिस डॉस सैंटोस हिच्यावर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप होता. पती हत्येच्या आरोपामध्ये दोषी आढळल्यानंर रियो डी जेनेरो हा निर्णय दिला. कोर्टाचा निर्णय हा ब्राझीलमधील राजकीय वर्तुळात अतिशय धक्कादायक मानला जातो आहे. या निकालाची जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच, जगभरातील प्रसारमाध्यमांनीही या निकालाची दखल घेतली आहे.
फ्लोरालिस डॉस सैंटोस हे रियो डि जेनेरो येथील प्रसिद्ध आणि वलयदार नाव आहे. प्रामुख्याने रियो डि जेनेरो येथील झोपडपट्ट्यांमधून डझनभर रस्त्यावरील मुलांना दत्तक घेतल्याबद्दल त्या विशेष प्रसिद्ध आहेत. वय वर्षे 61 असलेल्या फ्लोरालिस डॉस सैंटोस आणि पाद्री असलेला तिचा पती अँडरसन डो कार्मो (pastor Anderson do Carmo) हे एक प्रभावशाली जोडपे होते. मात्र, या जोडप्यातील पती पती अँडरसन डो कार्मो हा जून 2019 मध्ये उपनगरातील राहत्या घरात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला. त्याची हत्या झाल्याची चर्चा होती. संशयाची सूई पत्नी फ्लोरालिस डॉस सैंटोस हिच्यावर होती.
दरम्यान, संशयाची सूई पत्नी फ्लोरालिस डॉस सैंटोस हिच्यावर असली तरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तापस सुरु केला होता. दाखल गुन्ह्यानुसार डॉस सैंटोस हिच्यावर गंभीर आरोप होते. यात हत्या करणे, हत्येचा कट रचने, हत्येसाठी तिच्या मुलांना (दत्तक) गुन्ह्यात सहभागी करुन घेणे. सशस्त्र दरोड्यासाठी वेशांतर करणे असे अनेक आरोप होते. हे आरोप सिद्ध झाले त्यामुळे डॉस सैंटोस हिला न्यायालयाने तब्बल 50 वर्षांची शिक्षा ठोठावली.