FATF कडून पाकिस्तानला शेवटची चेतावणी, इमरान खान यांना 2020 पर्यंतचा वेळ दिला नाहीतर होणार कारवाई
इम्रान खान (Photo Credits: Instagram)

पाकिस्तानला एफएटीएफ (FATF) यांच्याकडून दिलासा मिळाला आहे. त्यानुसार 2020 पर्यंत पाकिस्तानला वेळ दिला असून सध्या ग्रे लिस्टमध्येच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता पाकिस्तानला शेवटची चेतावणी दिली गेली असून टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. परंतु वेळ वाढवून देऊन ही पाकिस्तानने कारवाई केली नाही तर येत्या काळात जे परिणाम भोगावे लागतील यासाठी तयार रहावे असे आव्हान देण्यात आले आहे. तुर्की, चीन आणि मलेशिया यांच्याकडून पाकिस्तानचे समर्थन करण्याच्या आधारावर एफएटीएफ यांनी ब्लॅक लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.

तर मंगळावारी झालेल्या एफएटीएफच्या बैठकीत पाकिस्तानला टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी आणखी ठोस पावले उचलण्यास सांगितले आहे. 36 देशांच्या एफएटीएफ चार्टर नुसार कोणत्याही देशाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकता येत नाही. कारण त्या देशाला कोणत्याही तीन देशांनी समर्थन दिल्यास त्याबाबत निर्णय घेता येत नाही.(FATF यांनी पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यास भविष्य धोक्यात, देशाला करावा लागेल 'या' परिणांमाचा सामना)

ग्रे लिस्ट म्हणजे काय?

मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणात जे देश पकडले जातात त्यांचे या लिस्टमध्ये नाव देण्यात येते. ही एक प्रकराची पू्र्वसुचना या देशांसाठी दिली जाते. त्याचसोबत देशात होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवणे किंवा आर्थिक घोटाळ्यांच्या विरोधात कारवाई करणे असे यामध्ये सांगण्यात येते. परंतु ग्रे लिस्ट मध्ये येऊन सुद्धा जर काही देश त्याच्या विरोधात कडक कारवाई करत नसेल तर त्यांचे नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात येण्याची शक्यता फार वाढते