FedEx Layoffs: फिडेक्स कंपनी करणार 10% कर्मचारी कपात
FEDEX | (PC: Twitter)

कर्मचारी कपात करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आता FedEx कॉर्पोरेशन (NYSE:FDX) ने सुद्धा आपला क्रमांक लावला आहे. FedEx कॉर्पोरेशनने बुधवारी जाहीर केले की ते "जलद गतीने बदलणाऱ्या वातावरणानुसार अधिक कार्यक्षम बनणे, टीकूण राहणे आणि काळानुसार बदलणे यासाठी" 10% पेक्षा जास्त कर्मचारी कमी (FedEx Layoffs) करत आहेत. लॉजिस्टिक्स फर्मने सांगीतले की ते आपले अधिकारी आणि संचालक मंडळातील पदे काढून टाकत आहेत. त्यासोबतच काही मंडळे आणि विभाग एकत्रित (Consolidating ) करत आहेत.

FedEx अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, कंपनीला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी ही एक आवश्यक कृती होती. दुर्दैवाने आम्हाला ती करावी लागली. व्यवसायाकडे गंभीरपणे पाहणे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार आमच्या नेटवर्कचा आकार अधिक चांगल्या प्रकारे पुनर्गठीत करुन आपली शक्तीस्थळे शोधून ती मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे. (हेही वाचा, IBM Layoffs: टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपात थांबता थांबेना! IBM ने 3900 कर्मचाऱ्यांना टाकलं कामावरून काढून)

FedEx वाढत्या महागाई आणि संभाव्य आर्थिक मंदी याला सामोरे जाताना वाढीव खर्च-बचत करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन नोकऱ्यांमध्ये 10% पेक्षा जास्त कपात करत आहे. FedEx चे CEO, राज सुब्रमण्यम म्हणाले, "'अधिक कार्यक्षम, आणि संस्थेला अधिक वेगवान' बनण्यासाठी FedEx आपल्या जागतिक व्यवस्थापन नोकऱ्यांमध्ये 10% पेक्षा जास्त कपात करत आहे.