घरातील दूध संपले म्हणून एका माथेफिरू पित्याने आपल्या 2 आणि 4 वर्षाच्या चिमुरडीला दारू पाजल्याची धक्कादायक घटना युक्रेनमध्ये (Ukraine) घडली. या दोघींच्या शरीरात दारूचे प्रमाण अधिक झाल्याने रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळल्या. सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघींना अल्कोहोल पॉयझनिंग झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिकोला असे या आरोपीचे नाव आहे.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा घरात त्या दोघी आणि आरोपी होते. या मुलींची कामानिमित्त दुस-या राज्यात गेली होती. त्यामुळे या दोन चिमुकल्यांना सांभाळत असताना या मुलींना भूक लागली. त्यांनी वडिलांकडे दूध मागितले. पण घरात दूध संपल्याने त्याने मुलींना दूधाच्या बाटलीत दारू भरून पाजली. त्यावेळी तोही दारूच्या नशेत होता. त्यानंतर मुली घराबाहेर खेळण्यास गेल्या असता अचानक बेशुद्ध पडल्या. शेजा-यांना संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. प्रमाणापेक्षा जास्त दारू शरीरात गेल्याने या मुली बेशुद्ध पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दोन्ही चिमुकलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी मिकोला कडून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेदेखील वाचा- मद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण
2018 मध्ये अशीच एक घटना युनायटेड किंग्डममध्ये घडली होती. जेथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आईमुळे तिच्या एका महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला होता. घटना अशी होती की ही आई आपल्या एका महिन्याच्या बाळाला घेऊन चक्क एका बार मध्ये गेली होती. आणि त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटं घातली. दारू पिऊन नशेच्या अवस्थेत असलेली एक 26 वर्षीय तरुण माता आपल्या बाळाच्या अंगावरच झोपली आणि त्यामुळे त्या चिमुकल्याला गुदमरून आपले प्राण गमवावे लागले.
हा सर्व प्रकार मागील वर्षी मार्च मध्ये घडला होता मात्र आता या प्रकरणी तरुणीला दोन वर्ष चार महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.