मद्यधुंद आईचा प्रताप, 'या' चुकीमुळे गमावले चिमुकल्याने प्राण
Representational Image (Photo Credits: Pixabay)

असं म्हणतात की, कोणतीही आई आपल्या चिमुकल्याची काळजी करण्यात कसलीच उणीव ठेवत नाही. नवजात बालकाला तर काही महिन्याचे होईपर्यंत घराच्या बाहेरही नेले जात नाही मात्र युनाइटेड किंग्डम (United Kingdom)  मध्ये याच्या अगदी उलट एक प्रसंग पाहायला मिळाला. मरिना टिल्लबी (Marina Tilby) नामक एक नव्याने आई झालेली तरुणी आपल्या एका महिन्याच्या बाळाला घेऊन चक्क एका बार मध्ये गेली होती. आणि त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटं घातली. दारू पिऊन नशेच्या अवस्थेत असलेली एक 26 वर्षीय तरुण माता आपल्या  बाळाच्या अंगावरच झोपली आणि त्यामुळे त्या चिमुकल्याला गुदमरून आपले प्राण गमवावे लागले. हा सर्व प्रकार मागील वर्षी मार्च मध्ये घडला होता मात्र आता या प्रकरणी तरुणीला दोन वर्ष चार महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या मृत बालकाचे नाव डारियन असे असून डॉक्टरच्या माहितीनुसार त्याच्या अंगावर झोपल्याने त्याचा श्वास गुदमरून गेला आणि त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. मरिना ही तरुणी मार्च महिन्यात आपल्या एका महिन्याच्या बाळाला घेऊन नाईट क्लब मध्ये गेली होती. त्यावेळी मरिनाची बहीण देखील तिच्या सोबत होती. तिच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, क्लब मध्ये गेल्यावर बराच वेळ मरीना आपल्या बाळासोबत खेळत होती. त्यानंतर तिला त्या क्लबमध्येच समवयस्कर दोन तरुण भेटले त्यांच्योबतच बाळाला घेऊन ती त्यांच्या घरी गेली व तिथे दारूचे सेवन केले.

यानंतर त्यातल्या एका तरुणाने तिला बाळाला ठेवण्यासाठी दुसऱ्या बेडची सोय करून दिली मात्र ते नाकारून मरिना आपल्या बाळाच्या शेजारीच झोपली मात्र रात्री झोपेत तिला भान नसताना हा सगळा प्रसंग घडला. मरिना बाळावर झोपल्याचे लक्षात येताच तिच्या बहिणीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला.सकाळी मरीनाला जाग येताच तिच्या अंगाखाली दबलेल्या डारियनला जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तिथे गेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले . गुजरात: मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरांनी केली प्रसुती, आई-बाळाचा मृत्यू

हा प्रसंग घडला त्यावेळी मरिना ही आपला पती व बाळाच्या वडिलांच्या संपर्कात नव्हती. बाळाच्या मृत्यूंनंतर मरिना बरेच महिने डिप्रेशन मध्ये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी कारवाई सुरु असताना न्यायाधीशांनी हा प्रकार आईच्या गैरजबाबदारी मुळेच ओढवला असल्याचे म्हंटले होते.