Farmers Protest: ‘जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही ट्विट करत राहू,’- Mia Khalifa चे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर
Mia Khalifa (Photo Credits: Video grab)

जेव्हापासून अभिनेत्री मिया खलीफा (Mia Khalifa) आणि अमांडा सेर्नी यांनी शेतकरी चळवळीविषयी (Farmers Protest) ट्विट केले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांना जोरदार लक्ष्य केले जात आहे. बर्‍याच ट्रोलमध्ये त्यांच्यावर पैसे घेऊन ट्विट केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु अशा प्रकारे ट्रोल झाल्यावरही या दोघींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यापूर्वी पेड ट्विट बाबत अमांडा सेर्नी यांनी प्रतिक्रिया दिली होती आणि मिया खलिफाचीही यावर प्रतिक्रिया आली आहे. ‘जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही ट्विट करत राहू,’ असे मिया खलिफाने म्हटले आहे.

अमेरिकेची अभिनेत्री अमांडा सेर्नी यांनी ट्विट केले आहे की, 'हे फक्त छळन्यासाठी आहे. मला बरेच प्रश्न आहेत ... कोण मला पैसे देते? मला किती पैसे मिळतात? मी माझे इनव्हॉईस कोठे पाठवू? मला पैसे कधी मिळतील? मी बरेच ट्विट केले आहे... मला अतिरिक्त पैसे मिळतील का?’ त्यानंतर मिया खलिफाने अमांडा सेर्नी यांच्या या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, 'जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ट्विट करत राहू.' अशाप्रकारे, मिया खलिफानेही ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. अमांडा आणि मिया खलीफाची ही ट्वीट खूप व्हायरल होत आहेत. (हेही वाचा: 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांनी सरकारला दिला अल्टीमेटम)

दरम्यान, मिया खलिफा भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सातत्याने ट्विट करत आहे. मात्र ती एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी असल्याने तिला शेतीबद्दल माहित आहे का? किंवा भारतीय खाद्यपदार्थाविषयी माहित आहे का? असे विचारूनही तिला ट्रोल केले गेले. आता मिया खलिफाने अशा ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले. मियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती भारतीय पदार्थ एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मिया सामोसे, गुलाबजामन असे भारतीय पदार्थ खाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्येही तिने शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे.