सध्या भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू लसीकरण (Corona Vaccination) सुरु झाले आहे. मात्र, जगभरात दिल्या जाणाऱ्या लसीमध्ये अशी एकही लस नाही जी 100 टक्के प्रभावी ठरेल. म्हणूनच की काय काही देशांमध्ये लस दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. इस्राईलमध्ये (Israel) कोरोना व्हायरस व्हॅक्सीन साइड इफेक्ट्सचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोविड-19 लस दिल्यानंतर 13 जणांना चेहऱ्याचा अर्धांगवायू (Facial Paralysis) झाला आहे. इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, असे दुष्परिणाम रिपोर्टच्या तुलनेत अधिक लोकांमध्ये आढळले असावेत.
WION च्या अहवालानुसार, तज्ञांना आता या लोकांना कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचा दुसरा डोस देण्याबाबत भीती वाटत आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयानेही चेहऱ्याचा पक्षाघात बरा झाल्यावरच दुसऱ्या डोसची शिफारस केली आहे. फायझरची लस दिल्यानंतर हे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, इस्त्रायली सरकारने फायझर आणि बायोएनटेक यांच्याबरोबर 8 दशलक्ष कोरोना लस डोससाठी एक करार केला होता. देशामध्ये 20 डिसेंबर 2020 मध्ये कोरोना लसीकरण सुरु झाल्यापासून दोन दशलक्षांहून अधिक लोकांना कोरोना लस प्राप्त झाली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 60 वर्षे किंवा त्यावरील वयाच्या 72 टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर दोन वृद्ध इस्त्रायलीही मरण पावले आहेत. (हेही वाचा: काय सांगता? आता आईस्क्रीमलाही झाली कोरोना विषाणूची लागण; China मधील प्रकरणाने उडाली खळबळ)
मिडिया आउटलेट्सचे म्हणणे आहे की, कोरोना लस घेतल्यानंतर 96 लोकांची परिस्थिती गंभीर होती. 24 जणांना अपंगत्व प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त 225 लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागेल आणि 1388 लोकांना आपत्कालीन आरोग्य सेवांची आवश्यकता भासली. मागील महिन्यातही असेच दुष्परिणाम नोंदविले गेले आहेत. लस चाचणी दरम्यान, चार स्वयंसेवक, ज्यांना फायझर लस शॉट देण्यात आले होते त्यांना Paralysis of Facial Nerve झाला होता.