काय सांगता? आता आईस्क्रीमलाही झाली कोरोना विषाणूची लागण; China मधील प्रकरणाने उडाली खळबळ
Ice cream (Photo Credits: Pexels)

कोरोना विषाणूबद्दल (Coronavirus) दररोज नवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत मानवात कोरोना विषाणूचा प्रसार होत होता. प्राण्यांमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. परंतु आता कोविड-19 ची अन्नपदार्थामध्ये पुष्टी झाली आहे. चीनमधील (China) हे एक विशेष प्रकरण आहे, जेथे आईस्क्रीमलाही (Ice Cream) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. या वृत्तानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे. आता चिनी अधिकाऱ्यांनी संक्रमणाचा धोका शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. स्थानिक कंपनी Tianjin Daqiaodao Food Company मध्ये तयार केलेल्या आईस्क्रीमच्या तीन नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे.

हे प्रकरण देशाच्या ईशान्येकडील Tianjin नगरपालिकेतील आहे. टियांजिन डकिआडो फूड कंपनीमधील 4,836 आईस्क्रीमच्या कॅनला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत त्यातील 2,089 कार्टन स्टोरेजमध्ये बंद केले आहेत. चिनी माध्यमांनुसार, संक्रमित डब्यांचे 1,812 डब्बे इतर भागात पाठविण्यात आले असून, 935 बॉक्स स्थानिक बाजारात दाखल झाले आहे. त्यापैकी 65 ची विक्री झाली आहे.

या प्रकरणानंतर 1,662 कर्मचार्‍यांना स्वत: हून आयसोलेशनमध्ये राहण्याचा व चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातील 700 जणांचे रिझल्ट्स नकारात्मक आले व उर्वरीत लोकांच्या रिझल्ट्सची प्रतीक्षा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर स्टीफन ग्रिफिन म्हणतात की, आईस्क्रीम कंटेनरमधील कोरोना विषाणूची पुष्टी मनुष्याद्वारे झाली आहे. ते पुढे म्हणाले की, प्रोडक्शन प्लांटमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाली असल्याची शक्यता आहे. (हेही वाचा: कोरोना विषाणू लसीकरणानंतर तब्बल 23 लोकांचा मृत्यू; Pfizer च्या लसीचे गंभीर दुष्परिणाम)

आईस्क्रीम बाहेरील देशांमधून आयात केलेली दुध पावडर, चरबीपासून बनविलेले आहे, तसेच आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले आहे, ज्यामुळे तेथे व्हायरस वाढणे सोपे झाले आहे. मात्र त्यांनी असेही सांगितले की, आईस्क्रीमच्या प्रत्येक बॉक्सला अचानक कोरोना विषाणूची लागण झाल्याबाबत आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही.