फेसबुक कंपनीने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षिततेसाठी खर्च केले 830 कोटी रुपये
Mark Zuckerberg (Photo Credits-Twitter)

जगातिल सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट असणारी फेसबुक (Facebook) कंपनीने त्याचे निर्माता आणि अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या सुरक्षिततेसाठी चक्क 830 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर गेल्या दोन वर्षात झुकरबर्ग ह्याच्या सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच कंपनीकडून एवढा खर्च कोट्यावधीच्या घरात जाऊन पोहचला आहे.

गेल्या वर्षात झुकरबर्ग यांच्या सुरक्षतेसाठी 2 कोटी डॉलर खर्च करण्यात आले होते. तर 2016 च्या तुलनेत ही रक्कम चार पट अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. सीएनईटीने दिलेल्या अहवालानुसार, कंपनीने सर्व खर्चाचा तपशील दिल्यानंतर ह्याचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत 15 लाख डॉलरने वाढ करण्यात आली आहे.(फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक)

फेसबुकवरील डेटा गेल्या काही दिवसांपासून चोरी होत असल्याचा प्रकार घडत आहेत. तसेच निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे झुकरबर्गच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कंपनीने याबद्दल स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, कंपनीचा कारभार पारदर्शक असून संचालकांनी झुकरबर्ग यांना असलेला धोका अतिशय गंभीररित्या घेतल्या आहेत.