भारत आणि एशियाई देशांमध्ये टेस्ला कार (Tesla Car) उत्पादन प्लांट लावण्याविषयी एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करुन एक भूमिका मांडली आहे. ही भूमिका काहीशी आक्रमक आणि स्पष्ट आहे. उल्लेखनिय असे की, एलन मस्क हे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नुकतेच त्यांनी ट्विटर खरेदी केले आहे. दरम्यान, मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जोपर्यंत कंपनीला दक्षिण एशियाई देशांमध्ये आयात कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी मिळत नाही. तोपर्यंत त्या देशांमध्ये टेस्ला कार उत्पादनाचे प्लांट सुरु करणार नाही.
ट्विटरवर एका युजरकडून टेस्लाच्या भारतात प्लांट उभारणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी प्रॉडक्शन प्लांट उभारणार नाही. जिथे आम्हाला पहिल्यांदा कार विक्री आणि कार सर्विसिंगची परवानगी नाही. एलन मस्क यांच्या या ट्विटवरुन ध्यानात येते की, भारत आणि टेस्ला यांच्यात उत्पादन करणारा कारखाना सुरु करण्याबाबत एकमेकांच्या मुद्द्यांवरुन विरोध दिसतो आहे. (हेही वाचा, Twitter Stock Price Manipulation: ट्विटर गुंतवणूकदारांकडून Elon Musk यांच्या विरोधात खटला दाखल, समभागांच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप)
ट्विट
What about Tesla ?
Is Tesla manufacturing a plant in India in future?
— Madhu sudhan V (@madhusudhanv96) May 27, 2022
दरम्यान, या आधी एप्रिलमध्ये भारतातील ऑटोमोबाईल निर्माणसाठी अनुकूल वातावरण यावर प्रकाश टाकत केंद्रीय रस्तेवाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, एलन मस्क यांचा भारतातील इ-वाहन निर्माण करणयाचे स्वागत आहे. परंतू, जर टेस्लाचे मालक चीनमध्ये कार उत्पादन आणि भारतात विक्री करत असतील तर तो प्रस्ताव फारसा चांगला असणार नाही. एका कार्यक्रमात गडकरी यांनी ही भूमिका व्यक्त केली होती. दरम्यान, याच कार्यक्रमात गडकरी यांनी म्हटले होते की, हा एक चांगला आणि सोपा पर्याय आहे. जर एलन मस्क भारतात टेस्ला कार उत्पादन करण्यास तयार असतील तर काहीच अडचण येणार नाही. आमच्याकडे सर्व प्रकारची उपलब्धता आहे. आम्ही सर्व प्रकारचे तंत्रज्ञान, जागा आणि मनुष्यबळ पुरवू शकतो.