Elon Musk Buys Twitter: सोमवारी अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलरमध्ये खरेदी करण्याचा करार केला. यासह 2013 पासून सार्वजनिक चालणारी कंपनी आता खाजगी झाली आहे. ट्विटरच्या विक्रीनंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल (CEO Parag Agrawal) यांच्या जाण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
ट्विटरमधून निरोप घेतल्यास पराग अग्रवालला काय मिळणार?
रिसर्च फर्म Equilar च्या मते, Twitter CEO पराग अग्रवाल यांना कंपनीच्या विक्रीच्या 12 महिन्यांच्या आत Twitter वरून काढून टाकल्यास त्यांना सुमारे $ 42 दशलक्ष मिळतील. ट्विटरच्या प्रतिनिधीने इक्विलरच्या अंदाजावर भाष्य करण्यास नकार दिला. (हेही वाचा - Elon Musk Deal with Twitter: इलॉन मस्क बनले ट्विटरचे नवे बॉस, 44 अब्ज डॉलरचा झाला करार)
ट्विटर खरेदीमुळे पराग अग्रवाल यांच्या भवितव्यावर शंका -
एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्याने, 2013 पासून सार्वजनिकपणे सुरू असलेली कंपनी आता खाजगी हातात जाईल. इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यापासून ज्या गोष्टीचा सर्वाधिक अंदाज लावला जात आहे तो म्हणजे ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांचे जाणे. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले होते. पण, एलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर पराग अग्रवाल कंपनीच्या सीईओ पदावरून दूर जातील अशी अटकळ बांधली जात आहे.
ऍलोनने एप्रिलच्या सुरुवातीला खरेदी केले 9.2 टक्के शेअर्स -
एप्रिलच्या सुरुवातीला एलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे सुमारे 9.2 टक्के शेअर्स खरेदी केले होते. तेव्हापासून, ट्विटरचे विद्यमान मंडळ त्याला संपूर्ण ट्विटर खरेदी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. 14 एप्रिल रोजी, मस्क म्हणाले की, ट्विटरच्या सध्याच्या मंडळाचा त्याच्यावर विश्वास नाही. यानंतर, एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्याच्या बातम्यांनंतर, पराग अग्रवाल यांना लवकरच ट्विटरच्या पदावरून काढून टाकले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, सध्या तरी ट्विटरने या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.