टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) नेहमीच प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावरसुद्धा ते चांगले सक्रीय असतात. नुकतेच त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वत:च्या 'संशयास्पद मृत्यू'बाबत लिहीले आहे. त्यामुळे सोशल मीडियात अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना सुरुवात झाली आहे. एलन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. नुकतीच त्यांनी माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केले आहे. तब्बल 44 बिलीयन डॉलर्सना हा व्यवाहार पूर्ण झाला.
एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर माझा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला तर ते छानच (knowin ya) होईल. एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक असण्यासोबतच टेस्ला इंकचे सीईओ आणि त्याशिवाय इतर दोन कंपन्या दर बोरिंग आणि SpaceX चे प्रमुख आहेत.
एलन मस्क हे एक कॅनेडीयन आई आणि दक्षिण अफ्रिकेचे कृष्णवर्णीय पती यांच्या पोटी जन्माला आलेले अपत्य आहे. त्यांचा जन्म दक्षिण अफ्रीकेच्या प्रिटोरिया येथे झाला. सुरुवातीच्या काळात शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्रियोरिया विद्यापीठात दाखल करण्यात आले. दरम्यान, काही काळातच ते 17 वर्षाचे असताना कॅनडा येथे गेले. काही काळ कॅनडामध्ये वास्तव्य केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत वास्तव्य सुरु केले. तिथे त्यांच्या नशिबाने दरवाजे उघडले. (हेही वाचा - Meta: यावर्षी फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये भरती होणार नाही, खर्च कमी करण्यासाठी मेटाने रणनीतीत केला मोठा बदल)
If I die under mysterious circumstances, it’s been nice knowin ya
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2022
पेन्सिलवेनिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर 1995 मध्ये ते कॅलीफॉर्नियाला गेले. जिथे त्यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठात दाखल करण्यात आले. परंतू पुढे त्यांनी शिक्षणाऐवजी काम-धंदा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या भावासोबत मिळून जीप2 नावाची वेब सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली.