Elon Musk यांनी युक्रेनला दिला मदतीचा हात; मंत्र्यांच्या विनंतीवरून Ukraine मध्ये सक्रिय केली Starlink Internet Service
Elon Musk (PC -Wikimedia Commons)

रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धाचा (Ukraine-Russia War) आज चौथा दिवस आहे. रशियन सैन्य सतत हल्ले करत आहेत, त्यामुळे युक्रेनमध्ये विनाशाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. युक्रेनकडून विनंती केल्यानंतर एलोन मस्क (Elon Musk) यांनी तेथे इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली आहे. एलोन मस्क यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची कंपनी स्पेसएक्सची स्टारलिंक सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सक्रिय झाली आहे.

कीवच्या एका मंत्र्याने युद्धग्रस्त देशासाठी स्टारलिंग इंटरनेट सेवेची विनंती केल्यानंतर एलोन मस्क यांनी पुढाकार घेतला आणि युक्रेनमध्ये स्टारलिंग सेवा सक्रिय केली. या मार्गावर आणखी टर्मिनल जोडले जात असल्याचे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. (वाचा - Ukraine-Russia War: रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले, Kharkiv येथील गॅस पाईपलाईनवर बॉम्बवर्षाव)

दरम्यान, युक्रेनचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी अब्जाधीश एलोन मस्क यांना युक्रेनला स्टारलिंक सेवा प्रदान करण्याचे आवाहन केले. युक्रेनच्या मंत्र्याला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, स्टारलिंक इंटरनेट सेवा आता युक्रेनमध्ये सक्रिय आहे.

स्टारलिंक इंटरनेट सेवा म्हणजे काय?

स्टारलिंक 2000 हून अधिक उपग्रहांचा एक समूह चालवते. ज्याचा उद्देश संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेटचा प्रवेश प्रदान करणे आहे. कंपनीने शुक्रवारी आणखी 50 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले.

रशिया युक्रेनमध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. रशियाने कीव, मारियुपोल, खार्किवसह इतर अनेक शहरांना लक्ष्य केले आहे. खार्किवमध्ये रशियन सैन्याने गॅस पाइपलाइनही उडवली. त्याच युक्रेनियन सैन्यानेही अनेक रशियन सैनिक आणि विमाने पाडल्याचा दावा केला आहे.