Pakistan PM Shehbaz Sharif (File Image)

पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यावर मात करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकारही महागाई आणि ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे पडले. आता सरकारने खर्च कमी करण्यासाठी वीज बचत (Electricity Saving) सुरू केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मंगळवारी सांगितले की, पाकिस्तानच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मंगळवारी ऊर्जा वाचवण्यासाठी आणि आयातित तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन योजनेला मंजुरी दिली. या अंतर्गत बाजार/मॉल रात्री 8:30 पर्यंत बंद केले जातील.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, सरकारने अकार्यक्षम उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची वार्षिक सुमारे 62 अब्ज रुपयांची ($273.4 दशलक्ष) बचत होईल. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या सर्व विभागांकडून वीज वापर 30 टक्के कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. आसिफ यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना कार्यालयातील अनावश्यक विजेच्या वापराविरुद्ध आदेश दिले आहेत.

जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री म्हणाले की, आदेशाचे पालन करण्यासाठी, प्रतिकात्मक कारवाईत मंत्रिमंडळाची बैठकही विजेशिवाय घेण्यात आली. आसिफ म्हणाले, ऊर्जा विभागाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने ऊर्जा बचत योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे, जी देशभरात लागू केली जाईल. योजनेनुसार लग्नगृहे (Wedding Halls) रात्री 10 वाजता बंद होतील आणि बाजार रात्री 8:30 वाजता बंद होतील. मंत्री म्हणाले की या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे देशाची 62 अब्ज रुपयांची बचत होऊ शकते. (हेही वाचा: पाकिस्तानमधील बेरोजगारी शिगेला; अवघ्या 1,167 पदांसाठी जमले 30 हजार तरुण, चक्क स्टेडियममध्ये घ्यावी लागली परीक्षा)

महत्वाचे म्हणजे, परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाने केलेल्या इतर काही उपायांमध्ये 1 फेब्रुवारीपासून हीटिंग बल्बचे उत्पादन थांबवणे समाविष्ट आहे. तर अधिक वीज वापरणाऱ्या पंख्यांचे उत्पादन जुलैपासून बंद करण्यात आले आहे. आता विद्युत पंखे बनवणारे कारखाने देखील बंद केले जातील, असे आसिफ यांनी जाहीर केले. असिफ म्हणाले, अकार्यक्षम पंखे सुमारे 120-130 वॅट पॉवर वापरतात. जगभरात, 60-80 वॅट्स वापरणारे पंखे उपलब्ध आहेत. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, सरकार पंख्यांमधील विजेचा वापर कमी करण्यासाठी एक कार्यक्रम राबवत आहे. वीज बचत करण्यासाठी सर्व सरकारी संस्था कार्यक्षम उपकरणे बसवतील.