गुरुग्राम येथील हाफिज सईद ह्याचा बंगला 'ईडी'कडून जप्त
Hafiz Saeed (Photo Credits-Twitter)

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) सुत्रधार आणि 2008 मधील मुंबईतील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद (Hafiz Saeed) ह्याला ईडी (ED)ने दणका दिला असून त्याचा गुरुग्राम (Gurugram) येथील बंगल्यावर जप्ती आणण्यात आली आहे. तसेच या बंगल्याची किंमत कोट्यावधींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज हा काश्मिर येथील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली (Zahoor Ahmad Shah Watali) याच्या मदतीने गुरुग्राम येथील बंगला विकत घेतला होता. या बंगल्यासाठी एफआएफ संस्थेकडून पैसे घेऊन बंगल्याची उभारणी केल्याचा संशय ईडी यांना आला आहे. तर जहूर ह्याला  यापूर्वी नॅशनल इन्विस्टिगेशन एजेंसीने (NIA) हाफिजला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.(हेही वाचा-पाकिस्तानची कारवाई; मसूद अझरच्या भावासह 44 दहशतवाद्यांसह अटक, मालमत्ता जप्त)

त्याचसोबत यूएई मधून पैसे हवालाच्या माध्यमाने भारतात आणल्याचे उघडकीस आले आहे. तसेच 24 ठिकाणी बनावट नावांचा वापर करुन मालमत्ता खरेदी केल्याचे तपासणी दरम्यान समोर आले आहे. त्यामुळे अन्य मालमत्तेवर लवकरच ईडीकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पैशांचे व्यवहार हाफिजने ज्या बँकेतून केले आहे त्या बँक खात्याचे तपशील ईडीने घेतले जमा केले आहेत.