271 कोटी आणि दोन मुलांना घेऊन पळून गेलेल्या दुबईच्या राणीला इंग्लंड देणार संरक्षण?; कोर्टात याचिका दाखल
दुबईचे पंप्रधान आणि हया (संग्रहित संपादित प्रतिमा)

संयुक्त अरब अमीरात (UAE) चे अरबपति शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid al Maktoum) यांची, सहावी राणी हया बिंत अल हुसेन (Haya bint al-Hussein) आपल्या दोन मुलांना आणि जवळपास 271 कोटी रुपये घेऊन दुबई सोडून पळून गेली होती. त्यानंतर आता तिने इंग्लंडकडे संरक्षण मागितले असून आपल्याला घटस्फोट आणि आपल्या मुलांची कस्टडी मिळावी याबाबत लंडन कोर्टात याचिका दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी हया मुले आणि पैसे घेऊन दुबईमधून बाहेर पडली होती. त्यानंतर आज तिला लंडन कोर्टात पहिले गेले. जर्मनीमार्गे ती इंग्लंडला पोहचली असावी असे म्हटले जाते. हया जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची सावत्र बहीण आहे. ब्रिटनमधील प्रेस असोसिएशन वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. ब्रिटनच्या कायद्याप्रमाणे फोर्स्ड मॅरेज प्रोटेक्शन ऑर्डर अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचे जबरदस्ती लग्न लावून दिल्यास त्यांना त्याविरोधात संरक्षण देण्यात येते. त्यामुळे हया यांनी इंग्लंडकडे मदत मागितली आहे. (हेही वाचा: दुबई च्या राजाची बायको 271 कोटी आणि दोन मुलांना घेऊन देश सोडून पळाली; संसारात खुश नसल्याने 'हया'ला हवा आहे घटस्फोट)

दरम्यान, शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी आपल्या मुलांनी परत दुबईला यावे अशी विनंती केली आहे. आता शेख आणि हया यांच्यामधील वाद या संपत्ती अथवा घटस्फोट नसून मुलांचे पालकतत्व हा आहे. 2004 साली हया आणि शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्याशी विवाह केला होता. 20 मे पासून हयाला सार्वजनिकरित्या कोणीही पहिले नव्हते. सोबतच तिचे सोशल मिडिया अकाउंट्स देखील फेब्रुवारी पासून अपडेटेड नाहीत. त्यानंतर आता ती सार्वजनिकरित्या दिसली होती.