Donald Trump Accused For Sexual Assault: डोनाल्ड ट्रम्प यांनी EX Model अ‍ॅमी डोरिस वर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, वाचा सविस्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credits: Getty/File)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर माजी मॉडेलने लैंगिक अत्याचार आणि शोषण (Sexual Assault) केल्याचा आरोप लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 वर्षांपूर्वी 1997 च्या US Open tennis tournament दरम्याम आपल्यावर अत्याचार केले असे डोरिस यांंनी अलिकडेच द गार्डियन ला दिलेल्या मुलाखतीत म्हंंटले आहे. न्युयॉर्क मध्ये टुर्नामेंट दरम्यान ट्रम्प यांंनी आपल्या VIP बॉक्स मधील बाथरुम च्या बाहेर मारहाण केली होती असा खुलासा डोरिस यांंनी केला आहे. यावेळी ट्रम्प हे 51 वर्षाचे होते तर डोरिस या अवघ्या 24 वर्षाच्या होत्या तसेच या घटनेचा आपल्यावर इतका परिणाम झाला की बरेच दिवस मी आजारी होते आणि माझे मानसिक खच्चीकरण झाले होते असेही डोरिस यांंनी सांंगितले.

अ‍ॅमी डोरिसने सांंगितल्यानुसार, “न्युयॉर्क च्या टुर्नामेंट वेळी VIP बॉक्स मधील बाथरुम बाहेर ट्रम्प यांंनी तिला वाईट पद्धतीने स्पर्श केला होता, स्वतःची जीभ त्यांंनी अ‍ॅमीच्या गालावर जबरदस्ती लावली, किस करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, अ‍ॅमीने त्यांंना ढकलुन देण्याचा प्रयत्न केला मात्र तिला ते शक्य झाले नाही शेवटी चावुन तिने स्वतःची सुटका करुन पळ काढला, याबाबत स्वतःच्या बॉयफ्रेंडला सांंगितले असता त्याने सुद्धा अ‍ॅमीला मदत करण्यास नकार दिला" या सगळ्याचा मानसिक दबाव असल्याने मी इतकी वर्ष शांंत राहिले असे डोरिस ने सांंगितले आहे.

हे सगळं प्रकरण सांंगताना अ‍ॅमी ने ‘द गार्डियन’ला यूएस ओपन स्पर्धेचे त्या वर्षातले तिकिट तसंच काही फोटोही दिले आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांंच्या वकिलांंनी हे सगळे आरोप फोल असल्याचे सांंगितले आहे. याआधीही अनेक महिलांंनी सार्वजनिक स्तरावर ट्रम्प यांंच्यावर आरोप लगावले आहेत.

अ‍ॅमी डोरिस सध्या फ्लोरिडात वास्तव्य करते. तिने ‘द गार्डियन’ला यूएस ओपन स्पर्धेचे त्या वर्षातले तिकिट तसंच काही फोटोही दिले आहेत. अ‍ॅमी डोरिसने 2016  मध्ये याबाबत खुलासा करण्याचे ठरवले होते. मात्र याचा कुटुंबाला त्याचा त्रास होईल असा विचार करुन त्यांंनी इतके वर्ष मौन पाळले होते.