अलास्काला जाणाऱ्या फ्लाइटमधील 61 वर्षीय प्रवाशाने प्रवासादरम्यान जास्त मद्यपान केल्यावर केबिन क्रू सदस्यांपैकी एकावर जबरदस्ती करत त्याचा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड अॅलन बुर्क नावाच्या प्रवाशांने 10 एप्रिलला मिनेसोटाहून निघालेल्या फ्लाइटमध्ये "लेव्हल 2 सुरक्षा धोका" निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार बुर्क हा प्रथम श्रेणीचा प्रवासी असल्याने त्याला दारू पिण्याची परवानगी होती. तथापि, फ्लाइटच्या नियमांमुळे त्याला पेय दिले गेले , बुर्कला ज्या फ्लाइट अटेंडंटने सर्विस दिली तोच त्याच्या कथितरित्या हल्ल्याचा बळी ठरला. फ्लाइट अटेंडंटचे चुंबन घेण्यापुर्वी त्यांने त्याचे कौतुक केले आणि त्याला टीप देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकरल्यानंतर बुर्कने फ्लाइट अटेंडंटला आपल्या जवळ ओढून त्याच्या मानेवर चुंबन घेतले.
या घटनेनंतर फ्लाइट अटेंडंटने डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आले. भांडणाच्या वेळी, बर्कने कॅप्टनसाठी ठेवलल्या जेवणाच्या ट्रे चे देखील नुकसान केले. लँडिंगनंतर, पायलटने घटनेची माहिती देण्यासाठी विमानतळ डिस्पॅचशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान, बुर्कने एफबीआय अधिकार्यांना सांगितले की त्याने डिश फोडली नाही आणि फ्लाइट अटेंडंटचे चुंबन घेतले नाही किंवा तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बुर्कला प्राणघातक हल्ला आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या आरोपाखाली २७ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.