Cryptocurrency: एका Bug मुळे युजर्सना चुकून मिळाली तब्बल 90 कोटी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी; परत मिळवण्यासाठी CEO सर्वांसमोर जोडत आहे हात 
Cryptocurrency (Photo Credits-Twitter)

सध्या क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) बहुतेक देशांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, अशी एक घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का दिला आहे. फायनान्स प्लॅटफॉर्म कंपाऊंडवर काही अपडेट केले जात होते. या दरम्यान एका बगमुळे (Bug) वापरकर्त्यांना तब्बल 90 दशलक्ष डॉलर्स क्रिप्टोकरन्सी मिळाली आहे. आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ही क्रिप्टोकरन्सी परत मिळवण्यासाठी प्रत्येकाला हात जोडून विनंती करत आहेत. अनेक क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मवर बँका किंवा मध्यस्थ नसतात, त्यामुळे अशा समस्या उद्भवतात.

डिसेन्ट्रलाइज्‍ड फाईनान्स (Defi) प्लॅटफॉर्ममध्ये बँका किंवा इतर मध्यस्थ नसतात. ते पूर्णपणे संगणक कोडद्वारे नियंत्रित केले जातात. हे कोड इज लॉ वापरून संगणक कोड प्रणाली नियंत्रित करते. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की. जेव्हा जेव्हा कोडमध्ये चूक होते तेव्हा तेव्हा नेहमी अशा मोठ्या समस्या उद्भवतात.

अनेक क्रिप्टो प्रकल्पांवर टीका करणारे अमेरिकन फॉर फायनान्शिअल रिफॉर्मचे वरिष्ठ धोरण विश्लेषक अँड्र्यू पार्क म्हणतात की, ही सध्याची समस्या बँकिंग व्यवस्थेमुळे आहे. त्यांच्या प्रणालीमध्ये कोणताही दोष किंवा इतर समस्या नाही. त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या प्रणालीमध्ये अशी काही समस्या उद्भवल्यास त्याबाबत त्यांच्याकडे ठोस उपाय आहेत. (हेही वाचा: Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Dogecoin यांची किंमत कशी ठरते? कोणते घटक ठरतात कारणिभूत?)

कंपाऊंडमधील चूक ही सध्या घडलेली एक हाय-प्रोफाईल चूक आहे. क्रिप्टो प्रकल्प गेल्या महिन्यात अनेक तासांसाठी ब्लॅकआउट झाला होता. ऑगस्टमध्ये एका हॅकरने दुसऱ्या डीएफआय प्रकल्पातील त्रुटीचा फायदा घेऊन सुमारे $ 600 दशलक्ष किमतीचे टोकन गोळा केले, परंतु नंतर हे त्याने परत केले.