क्रूरतेचा कळस! Ex-Girlfriend चा बदला घेण्यासाठी प्रियकर पोहोचला 'या' थराला; वाचून अंगावर येईल काटा 
भांडण | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

एखाद्यावर प्रेम करणे, ते व्यक्त करणे सोपे असते परंतु नाते सुरु झाल्यावर ते सांभाळणे कठीण असते. अनेकदा काळात-नकळत नात्यात काही चुका घडतात, ज्यामुळे दोघांमधील अंतर वाढते आणि त्याचा परिणाम म्हणजे नाते तुटते. अमेरिकेतही (US) असेच एका जोडप्याचे नाते तुटले मात्र, विभक्त झाल्यानंतर हा प्रियकर आपल्या एक्स-प्रेयसीचा बदला घेण्यासाठी इतक्या मोठ्या थराला गेला जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नाते तुटल्यानंतर या 25 वर्षीय प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली.

25 वर्षीय Javier Da Silva Rojas याला त्याच्या कृत्याबद्दल अमेरिकेच्या कनेक्टिकट (Connecticut) येथील न्यायालयाने 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कोर्टात सांगण्यात आले की झेवियर 28 जानेवारी 2019 रोजी आपली एक्स-प्रेयसी व्हॅलेरी रेयेसच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने आपला फोन फ्लाइट मोडवर ठेवला होता. घरात दोघांमध्ये खूप भांडणे झाली. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि Javier ने व्हॅलेरीच्या डोक्याला दुखापत केली.

त्यानंतर, त्याने तिला एका टेपने बांधले आणि एका सूटकेसमध्ये बंद केले. त्याने ती सुटकेस 10 मैल दूर नेली. जंगलाचा परिसर पाहून त्याने ती सुटकेस तिकडे फेकून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुदमरल्याने व्हॅलेरीचा मृत्यू झाला. दोन दिवस व्हॅलेरीचा कोणताही पता नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. जेव्हा पोलिसांनी झेवियरकडे याची चौकशी केली, तेव्हा त्याने सांगितले की, ते मागच्या आठवड्यात भेटले होते व त्यांनी सेक्स केला. त्यावेळी व्हॅलेरी जमिनीवर पडली होती, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. (हेही वाचा: Bouncer बॉयफ्रेंडसोबत Sex Game, गर्लफ्रेंडचा मृत्यू; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड)

या प्रकरणाच्या सुमारे एक आठवड्यानंतर, 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांना सुटकेस सापडली, ज्यावर झेवियरचे डीएनए सापडले. व्हॅलेरीच्या नखांवरही त्याचे डीएनए होते. यादरम्यान झेवियरने व्हॅलेरीचा लॅपटॉप आणि डेबिट कार्ड चोरले होते. त्याद्वारे त्याने तिच्या खात्यातून सुमारे 4 लाख रुपये काढले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ झेवियरला अटक केली. झेवियरने आपला गुन्हा काबुल केला आणि 23 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.