Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्निला मारहाण;40 वर्षीय भारतीय वंशाच्या पुरुषाला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
Representational image (Photo Credit- IANS)

Crime News : एका भारतीय वंशाच्या विवाहित पुरुषाला सोमवारी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पत्निवर विवाहबाह्य संबंधाचा संशय आसल्याने एम कृष्णनने पत्नि मल्लिका बेगम रहमानला (40) अनेक वेळा जबर मारहाण केली होती. त्यात तिचा अखेर मृत्यू झाला. सिंगापूर न्यायलयाने एम कृष्णन याला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, मल्लिकालाही पतीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय होता. नोव्हेंबर 2015 मध्ये एकदा तिने पतीला तिच्या मैत्रिणीसबत दारू पिताना रंगेहाथ पकडे होते. 2017 मध्ये कृष्णन याने पत्नीला अशाच एका कारणवरून मारहाण केली होती. त्यावेळी तिने कसेबसे स्वत: ला वाचवत. पोलीस स्टेशन गाठले होते. पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत नमूद केले होते की, पतीकडून तिला अनेक वेळा मारहाण झाली. त्याला दारूचे व्यसन आहेत. दारू पिल्यानंतर तर तो आणखी हिंसक होतो. त्याशिवाय त्याला आजारही आहे. ज्यात त्याला अनेक वेळा क्षुल्लक गोष्टींवरून राग येतो. रागात तो आणखी तीव्र हिंसक होतो आणि मारहाण करतो.

न्यायमूर्ती थेन यांनी या प्रकरणी सुनावणी दरम्यान, "त्याला विकाराचे निदान झाले असले असे म्हटले. मात्र, आरोपींना दारू पिऊन मारणे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य आहे".महिलांवरील वारंवार होणाऱ्या घरगुती अत्याचाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी कृष्णनला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

2019 मध्ये झालेल्या एका वादात कृष्णनने मल्लिकाच्या चेहऱ्यावर लाथ मारली, तिला चापट मारली, पोटात आणि पायावर जोरात मारहाण केली होती. ती स्वत:ला वाचवण्यासाठी किचनमध्ये गेली तेव्हा मल्लिका तेथील कपाटाला आदळली आणि बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर कृष्णनने तिला रूग्णालयात दाखल केले. तेथे मल्लिकावर उपचार झाल्यानंतर जेव्हा ती घरी आली तेव्ही पुन्हा कृष्णनने तिला मारहाण केली. रागाच्या भरता त्याला मल्लिका पुन्हा बेशुद्ध झाल्याचे कळेल नाही. काही वेळीने मल्लिकाचे श्वास घेणे ही थांबले होते. शवविच्छेदनात असे आढळून आले की डोक्याला मार लागल्याने मल्लिकाचा मृत्यू झाला होता. तिच्या डोक्याला, मानेच्या मागच्या बाजूला, चेहरा आणि शरीराभोवती अनेक जखमा होत्या. 17 जानेवारी 2019 रोजी दुपारी कृष्णनने पोलिसांना आत्मसमर्पण केले.