Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) लस कधी मिळणार याकडे जगभरातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर ब्रिटेनचे आरोग्यमंत्री मॅट हैनकॉक यांनी असे म्हटले आहे की, Pfizer ची कोरोना व्हायरसवरील लस सुरक्षित आणि प्रभावी घोषित केल्यास ती ख्रिसमसपूर्वी ती देण्यास सुरुवात केली जाणार आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही कंपनी सोबत मिळून काम करत आहोत. फायजर वॅक्सीन आल्यास ती ब्रिटेन मधील लोकांना डिसेंबर महिन्यापासूनच देण्यास सुरुवात करणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला मॉडर्ना इंक (Moderna Inc) कंपनीने असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी ही लस 94.5 टक्के प्रभावी ठरणार आहे.

फायजर लसीसोबत ही सुद्धा 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरु शकते. त्याचसोबत मॉडर्ना इंक यांनी असे म्हटले की, अमेरिकेकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या काळात आपत्कालीन परिस्थितीत लस म्हणून त्यांच्याकडे दोन ऑप्शन असणार आहे. ते म्हणजे एक फायजर आणि दुसरी मॉडर्ना लस. या दोन्हींपैकी कोणतीही लस नागरिकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी दिली जाऊ शकते.(Covid-19 Vaccine Update: Sputnik V लस कोरोना व्हायरस वर 92% परिणामकारक; रशियाचा दावा)

दरम्यान, दोन्ही लसी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित केल्या गेल्या आहेत. त्या MRNA च्या रुपात ओळखल्या जातात. त्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले जात आहे. कोरोन व्हायरसमुळे जगभरातील 54 मिलियन लोकांना त्याचे संक्रमण झाले असून 1.3 मिलियन नागरिकांचा बळी गेला आहे. लसीबद्दल बातमी तेव्हा पुन्हा आली ज्यावेळीस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तुफान वाढ होण्यास सुरुवात झाली. तर अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा असून काही युरोपीय देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.