
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट संपूर्ण जगभरात कायम आहे. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या एका रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या भयावह परिस्थितीमध्ये 14.7 कोटी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर संपूर्ण जगभरात सुमारे 2 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोविड-19 हे केवळ आरोग्य संकट राहिलेले नसून आर्थिक संकटही झाले आहे. अमेरिका, चीन यांसारख्या देशांची आर्थिक घडी विस्कटली असून या देशांमध्ये झालेले आर्थिक नुकसान इतर देशांच्या तुलनेत मोठे आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराही मोठा फटका बसला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारात खूप सारे व्यवसाय हे एकमेकांशी संलग्न आहेत. या साखळीमध्ये मॅनिफाक्चरिंग, टुरिझम आणि टान्सपोर्ट अशा विविध इंडस्ट्रीचा समावेश आहे. अशी माहिती ऑस्ट्रेलिया मधील युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या रिसर्चर अरुनीमा मलिक यांनी दिली आहे. मल्टीरिजन इनपूट, आऊटपूट अॅनालिसिस या मेथडमुळे (MRIO) रिसर्चंना जगभरातील प्रत्येक देशामध्ये किती नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला कसा फटका बसला, याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, हे दिसून येते. (जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 1.24 कोटींच्या पार; पहा कोविड-19 च्या रुग्णसंख्येनुसार जगभरातील देशांची यादी)
या अॅनालिसिसमधून असे समोर आले आहे की, या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण कोरोना व्हायरसच्या काळात विविध वस्तूंचे उत्पादन कमी झाले. तसंच रस्ता वाहतूक, विमान प्रवास कमी झाला. त्यामुळे पर्यावरणाला फायदा झाला असल्याचेही रिसर्चमधून दिसून आले आहे.
MRIO च्या अॅनालिसिसनुसार, 2.5 मेट्रिक गीगाटन एवढे ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये रिडक्शन झाले आहे. त्याचप्रमाणे सल्फरडाय ऑक्साईड, NOX गॅस यांसारख्या प्रदुषित करणाऱ्या गॅसेसेचे प्रमाणही कमी झाले आहे.
कोरोना व्हायरस संकटाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. त्यामुळे सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 20 लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत समाजातील विविध स्तरातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे.