Bill Gates | File Image | (Photo Credit: Getty Images)

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे (Microsoft Company) सहसंस्थापक आणि अध्यक्ष बिल गेट्स (Bill Gates)  यांनी जागतिक महारोगराई कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे म्हटले आहे. याच दरम्यान अमेरिकेने डब्लूएचओ (WHO) यांचे फंडिंग थांबवल्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून याचे परिणाम भयंकर होण्याची शक्यता असल्याचे ही म्हटले आहे. बिल गेट्स यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस सारख्या महारोगाच्या काळाच डब्लूएचओ यांचे फंडिंग थांबवणे खतरनाक आहे.डब्लूएचओ यांच्याकडून करण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत केली जात आहे. परंतु जर डब्लूएचओ यांचे काम थांबल्यास अन्य कोणतीही दुसरी संगठना त्यांची जागा घेऊ शकत नाही. सध्या डब्लूएचओ यांची अधिक गरज आहे.

डब्लूएचओ यांच्याकडून संपूर्ण जगभरातील देशांसाठी काम करते. यामध्ये आरोग्य ते आधुनिक उपकरणे उपलब्ध करुन देतात. तसेच डब्लूएचओ यांच्याकडून विविध देशांना पैसे सुद्धा पुरवले जातात. त्या अंतर्गतच  जागतिक संगठना काम करतात. तर अमेरिका जागतिक आरोग्य संगठनेसाठी 400 मिलियन डॉलर्सची फंडिग डब्लूएचओ यांच्याकडून केली जाते. हे फंडिंगमधील पैसे नागरिकांच्या मदतीसाठी वापरला जातो. परंतु डब्लूएचओ यांनी कोरोना संबंधित माहिती लपवण्याचा आरोप लावत अमेरिकेने त्यांचे फंडिंग बंद केले आहे. (Coronavirus: ढासळलेली अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी डोनाल्ड ट्रंप घेणार भारतीय दिग्गजांकडून सल्ले; स्थापन केली समिती, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांचा समावेश)

तर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओ यांच्यावर कोरोना व्हायरस संबंधित माहिती लपवल्याचा आरोप लावला आहे. त्याचसोबत ट्रंप यांनी अमेरिकेसाठी देण्यात येणारा फंड सुद्धा रोखण्यास सांगितला आहे.

ट्रम्प यांनी असे ही म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासंबंधित व्यवस्थापनात गंभीर चूक करणे आणि माहिती लपवल्यामुळे डब्लूएचओ यांची भुमिका स्पष्ट होत नाही तो पर्यंत ही बंदी कायम असणार आहे. जॉन्स हॉपिकन्स युनिवर्सिटी यांच्या नुसार, कोरोना व्हायरसमुळेआता पर्यंत अमेरिकेत 25 हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. तर जगभरात 1,19,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .