Coronavirus World Update: जगभरात 17.28 कोटींपेक्षाही अधिक कोरोना संक्रमित; मृतांचा आकडा 37.1  लाखांच्याही पार
Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी संकट आव्हान बनले आहे. जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या तब्बल 17.28 कोटी इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 37.1 लाख लोकांचे मृत्यू झाले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने (Johns Hopkins University) ही आकडेवारी (Coronavirus World Update) जाहीर केली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजीनियरिंग (CSSE) ने रविवारी (6 जून) ही आकडेवारी दिली. ही आकडेवारी देताना सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित आणि मृत्यू झालेल्यांची संख्या अनुक्रमे 72,859,51 आणि 3,718,408 इतकी आहे.

सीएसएसआयने दिलेल्या आकडेारीनुसार जगभरात कोरना संक्रमितांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशामध्ये अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेत 33,357,080 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमीत आहेत. तर 597,377 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,88,09,339 इतकी आहे.

जगभरात 30 लाखांहून अधिक कोरोना संक्रमित असलेल्या देशांमध्ये समावेश असलेल्या देशांची यादी पुढील प्रमाणे. ब्राजील (16,907,425), फ्रान्स (5,769,291), तुर्की (5,282,594), रशिया (5,058,221), यूके (4,527,577), इटली (4,230,153), अर्जेंटीना (3,939,024), जर्मनी (3,706,934) , स्पेन (3,697,981) आणि कोलंबिया (3,547,017).

दरम्यान, कोरोना व्हायरस संक्रमणामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये 472,531 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू असलेले देस पुढील प्रमाणे. भारत (344,082), मॅक्सिको (228,568), यूके (128,099), इटली (126,472), रशिया (121,365) आणि फ्रान्स (110,135) .