Boris Johnson, Prime Minister of England Boris Johnson, Prime Minister of England | (Photo Credits: Twitter/BorisJohnson)

इंग्लंडचे पंतप्रधांन बोरिस जॉनसन (Boris Johnson) हे सोमवारपासून पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात करणार आहेत. ते डाऊनिंग स्ट्रीट (Downing Street) येथे परतणार आहेत. बोरिस जॉनसन यांना कोविड 19 (COVID-19) संक्रमन झाले होते. त्यामुळे गेले काही काळ ते रुग्णालयात दाखल होते. वृत्तसंस्था सिन्हुआच्या हवाल्याने आयएएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात जॉनसन यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना माहिती देताना सांगितले की, कोरोनाव्हायरस संक्रमन झाल्याने लंडन येथील सेंट थॉमस रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यावर आपल्या दैनंदिन कमासाठी आणि जबाबदारीसाठी आपण पुन्हा परतत आहोत.

स्काय न्यूजने आपल्या वृत्तत म्हटले आहे की, डॉक्टरांचा सल्ला घेऊन बोरिस जॉनसन हे डेली डाऊनिंग स्ट्रीय येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. जॉनसन यांची प्रकृती सध्या चांगली असून सोमवारपासून ते आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास सुरुवात करतील असेही वृत्त स्काय न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

इन्सेंटीव्ह केयर युनिट (आयसीयू) मध्ये काही काळ राहिल्यानंतर 12 एप्रिल या दिवशी जॉनसन यांनी सांगितले एक आठवड्याच्या प्रदीर्ख काळानंतर मी रुग्णालयातून परतलो एनएसएसने माझे प्राण वाचवले. स्काय न्यूजने सांगितले की, जॉनसन यांनी आपल्या सल्लागारांशी शुक्रवारी बैठक घेऊन चर्चा केली. इंग्लंडच्या हेल्थ सेक्रेटरी णॅट हॅनकॉक यांच्याशी चर्चा केल्यावर ते आपल्या आपल्या नेहमीच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास सुरुवात करतील.