धक्कादायक! चीनमध्ये Coronavirus मुळे तब्बल 1,665 जणांचा मृत्यू; देशात एकूण 68,500 जणांना लागण
Coronavirus Outbreak in China (Photo Credits: IANS)

चीनमध्ये (China) कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग आणि नुकतेच यामुळे झालेल्या 142 मृत्यूंमुळे एकूण मृतांचा आकडा 1,665 झाला आहे. आतापर्यंत एकूण 68,500 लोकांना संसर्ग झाली असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने देशात 2,009 नवीन प्रकरणांची पुष्टी केली आहे. हुवेई (Huwei) प्रांताची राजधानी असलेल्या वुहानमध्ये 1,843 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, नवीन प्रकरणे समाविष्ट झाल्याने हुवेईमध्ये एकूण 56,249 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या 142 लोकांपैकी, 139 जणांचा हुबेईमध्ये, दोन सिचुवानमध्ये आणि एक हुनानमध्ये मृत्यू झाला.

चीनच्या एका उच्च आरोग्य अधिका-याने सांगितले की, नवीन प्रकरणांची संख्या सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत एकूण 9,419 संक्रमित रूग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा आरोग्य कर्मचार्‍यांवरही गंभीर परिणाम होत आहे, आतापर्यंत 1,700 हून अधिक चिनी आरोग्य अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ रविवारी बीजिंगमध्ये पोहचून, या विषाणूचा सामना करण्यासाठी चीनी अधिकाऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना विषाणू पसरवल्याचा संशय असणारा स्टिव्ह वॉल्श अखेर सापडला)

याबाबत आरोग्य आयोगाने अहवाल दिला की, डब्ल्यूएचओ (WHO) तज्ञ संयुक्त मोहिमेद्वारे साथीच्या आजारावरील नियंत्रणाची कार्यक्षमता शोधण्यासाठी चीनमधील तीन प्रांतांना भेट देतील. दरम्यान, चीनच्या बाहेर हा विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या, जपानपासून खूप दूर उभ्या असलेल्या क्रूझ जहाजात आहे. असे सांगितले जात आहे की, जहाजात उपस्थित 285 लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अडकलेल्या अमेरिकन लोकांना बाहेर काढले जाईल आणि अमेरिकेत त्यांना दोन आठवड्यांसाठी एकांतात ठेवले जाईल.