चीन (China) मधील वुहान (Wuhan) शहारातून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसची (Coronavirus) दिवसेंदिवस नवी प्रकरणी समोर येत आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे चीन मध्ये एका दिवसात 254 नागरिकांचा मृत्यू झाला असून 15 हजार जणांना त्याचे संक्रमण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृतांचा आकडा हुबेई शहारात झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत डब्लूएचओ यांनी गुरुवारी माहिती दिली आहे. शासकीय न्यूज कंपनी 'शिन्हुआ' यांनी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, हुबेई प्रांतात बुधावारी कोरोना व्हायरसमुळे 242 जणांचा मृत्यू झाला तर 15 हजार नवी प्रकरणे समोर आली आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून अधिक काळ कायम असलेल्या कोरोनावर कोणताही ठोस उपचार करण्यात येत नाही आहे. परंतु डॉक्टरांकडून कोरोना झालेल्या नागरिकांची सतर्कपूर्वक काळजी घेतली जात आहे. गुरुवारी कोरोना व्हायरसची लागण होऊन मृतांचा आकडा 1367 वर पोहचला आहे. तसेच संक्रमण झालेल्यांचा आकडा 59,804 वर गेला आहे. चीन नंतर जपान मध्ये कोरोना व्हायरसची 203 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामधील सर्वाधिक लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना क्रुझवरच ठेवण्यात आले असून त्यामध्ये दोन भारतीयांचा सुद्धा समावेश आहे.(Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात)