Representational Image (Photo credits: FreeImages)

चीनमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. या व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 803 जणांचा जीव गेला आहे. तसेच 37 हजारांपेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. जपानच्या योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रूज जहाज 'डायमंड प्रिंसेस'मध्ये (Diamond Princess) कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. या क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले आहे. या नागरिकांना भारतात परतण्यासाठी 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

डायमंड प्रिंसेस' या क्रूजवर जवळपास 3 हजार 700 प्रवाशी आहेत. यामध्ये 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 21 जपानी, 5 ऑस्ट्रेलियन तर कॅनडाचे 6 नागरिक आहेत. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने या क्रूजमधील इतर नागरिकांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय सरकार या जहाजावर अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जपान सरकारच्या संपर्कात आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसचा धोका सर्वात अगोदर सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू)

या अलिशान क्रूज जहाजावर उपस्थित भारतीयांसाठी सरकार सतत जपानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या ट्वीट हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. डायमंड प्रिंसेस क्रूजवर 3 हजार 700 प्रवाशांमध्ये 6 भारतीय प्रवाशांचा समावेश आहेत. तसेच जवळपास 130 कर्मचारी हे भारतीय आहेत. या सर्वांची चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने सर्व भारतीयांच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत.