अमेरिकेत शाळेत विद्यार्थ्यांचा गोळीबार; एकाचा मृत्यू, 8 जखमी
Shooting (Photo Credits: ANI | Representational Image)

आता पर्यंत अमेरिकेत शाळेत गोळीबार, हल्ला, खून अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाने खबरदारी घेऊनही हे सत्र चालूच आहे. नुकतेच कोलोरॅडो सायन्स आणि टेक्नॉलॉजी स्कूलमध्ये (Colorado Science and Technology School) दोन विद्यार्थ्यांनी अंधाधुंग गोळीबार केला, यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी याच शाळेतील असून, या घटनेनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर असून, त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

(हेही वाचा: ऑस्ट्रेलियात नाईट क्लबच्या बाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू तर तीन जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, डेन्व्हरच्या उपनगरातील शाळेत हा प्रकार घडला. या दोन विद्यार्थ्यांनी शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी हा गोळीबार केला. यामध्ये एका विद्यार्थ्यावर 3 वेळा गोळी झाडली गेली, उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक बंदूक ताब्यात घेतली आहे. 1999 सालीदेखील असेच कोलमबाईनमध्ये दोन विद्यार्थ्यांनी असाच गोळीबार करून, 13 विद्यार्थी आणि एका शिक्षकाची हत्या केली होती. त्यावेळी अमेरिकेच्या इतिहासातील ही घटना भीषण घटनेपैकी एक होती.