ऑस्ट्रेलिया येथे एका नाइट क्लबच्या बाहेर गोळीबार झाला असल्याची घटना आज सकाळी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पहाटेच्या वेळी क्लबर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून हा दहशतवादी हल्ला आहे की नाही याबद्दल अद्याप कळू शकले नसल्याचे म्हटले आहे.
द एज या वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली असून हल्ला करण्यात आलेल्या क्लबचे नाव लव्ह मशीन असे आहे. यामध्ये क्लबचा एक सुरक्षारक्षसुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर सुद्धा गोळीबार करण्यात आला. तर अद्याप गोळीबाराप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.