Kids Watching TV |(Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

दक्षिण चीनमधील गुआंग्शी झुआंग (Guangxi Zhuang) स्वायत्त प्रदेशातील युलिन येथील एक व्यक्ती आपल्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही (Social Media) या व्यक्तीबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हा व्यक्ती एका मुलीचा वडील आहे आणि मुलीला दिलेल्या विचीत्र शिक्षेमुळे (Chinese Man Punishes Daughter) तो लोकांच्या संतापाचे कारण बनला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, त्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीला तिच्या एका चुकीच्या कृतीमुळे अतिरेकी शिक्षा दिली आहे. शिस्त (Discipline) लावण्याच्या नावाखाली या व्यक्तीने मुलीकडे एक वाडगा सोपवला. धक्कादायक म्हणजे हा वाडगा त्याने तिला तिच्या अश्रूंनी भरण्यास सांगितले. निश्चित केलेल्या वेळेपेक्षा अधीक कालावधी तिने दुरचित्रवाणी संच (TV) पहिला म्हणून त्याने तिला अशा प्रकारची शिक्षा दिली.

TV बंद केल्याने मुलीला दु:ख

मीडिया रिपोर्टनुसार, रात्रीच्या जेवणाच्या तयारीदरम्यान वडिलांनी मुलगी जियाजिया हिस जेवणाच्या टेबलावर बोलावले तेव्हा ही घटना घडली. जियाजिया तिचा आवडता टीव्ही शोमध्ये पाहण्यामध्ये गढून गेली होती. त्यामुळे तिने वडिलांच्या सूचनेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे. संतापलेल्या वडिलांनी निराश होऊन दूरचित्रवाणी संच बंद केला. त्यामुळे जियाजियाला अश्रू अनावर झाले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने तिला एक रिकामा वाडगा दिला आणि म्हटले, 'हा वाडगा अश्रूंनी पूर्ण भरला की, मग तू पुन्हा टीव्ही पाहण्यास सुरुवात करु शकतेस.' (हेही वाचा, Crafted Beds: झोपा, TV पाहा आणि कमवा 25 लाख रुपये; आरामदाई नोकरी, घ्या जाणून)

मुलीगी शिक्षा पूर्ण करताना आईकडून व्हिडिओ चित्रीत

जियाजियाच्या आईने रेकॉर्ड केलेला आणि डुयिन या चीनी शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, जियाजिया आपले अश्रू वाडग्यात गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. दहा सेकंदांहून अधिक काळ संघर्ष केल्यानंतर, तिने "हे कार्य पूर्ण करणे तिच्यासाठी अशक्य आहे" असे घोषित केले आणि आपण त्यासाठी असमर्थ असल्याचे घोषीत केले. त्यानंतर वडिलांनी तिला हसायला सांगितले आणि तिच्या चेहऱ्यावर अश्रू आणून हसत असल्याचा फोटो काढला. हा क्षण तिच्या आईला मजेदार वाटला. म्हणून तिने तो चित्रीत केला आणि सामायिकही केला. (हेही वाचा, Gurugram Shocker: बायकोने मागीतला टीव्ही, मोबाईल, संतापलेल्या पतीने केली हत्या)

जियाजिया रडतानाचा आणि वाडग्यात अश्रू भरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी वडिलांच्या कृतीचा निषेध केला आणि लहान मुलाला शिस्त लावण्याचा अयोग्य मार्ग म्हटले. ही घटना या आधी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करुन देणारी आहे. ज्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांना टेलिव्हिजनच्या बाजूला बसून गृहपाठ करणे आणि गृहपाठाकडे दुर्लक्ष करणे आदी कारणांमुळे जोरदार शिक्षा दिली होती. एका उल्लेखनीय प्रकरणात, पालकांनी मुलाला शिक्षा म्हणून रात्रभर टीव्ही पाहण्यास भाग पाडले आणि लहान मुलावर नजर ठेवली. वरवर शांत वाटणारी बाब पण शेवटी मुले टीव्ही पाहून थकली आणि झोपेसाठी विनवणी करु लागली. अकेर पहाटे 5 वाजता त्यांनी मुलांना झोपू दिले.