चीन: आयुष्यातील जोडीदाराला शोधण्यासाठी 'लव्ह स्पेशल' ट्रेनमधून नक्की प्रवास करा!
Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येक जण आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड उत्तम असावी याचा विचार करतात. त्यासाठी सोशल मीडियात विविध अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाल्यानंतर समोरचा व्यक्ती जोडीदारासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. त्यानंतर नात्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होते. परंतु चीन (China) मध्ये एका स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून आयुष्यातील जोडीदार शोधून काढण्याची ट्रिक वापरण्यात आली आहे.आता पर्यंत चीनमधील या ट्रेनमध्ये 1 हजारापेक्षा अधिक तरुण तरुणींनी प्रवास केला आहे.

'लव स्पेशल ट्रेन' (Love Special Train) नावाने चीनमध्ये याची ओळख आहे. या ट्रेनच्या माध्यमातून आयुष्यातील जोडीदाराची शोध घेणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. 1970 मध्ये चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या वन चाइल्ड पॉलिसीनुसार देशात गर्भपाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे देशात लग्न करण्यासाठी वधुवरांची सुद्धा कमतरता असल्याची समस्या निर्माण झाली आहे.परंतु ती दोन दिवस आणि एक रात्रच धावली. तसेच लव्ह ट्रेनला 3 वर्षांपूर्वीसुद्धा लॉन्च करण्यात आली होती. चीनमध्ये जवळजवळ 20 करोड लोक अद्याप अविवाहित आहेत.(योगा करायली गेली अन् 110 हाडे मोडून आली!)

चीनमधील ही लव्ह स्पेशल ट्रेन चोंगकिंग नॉर्स स्टेशन ते कियानजियांग स्टेशन सुरु करण्यात आली आहे. एशिया वन यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ही ट्रेन 10 ऑगस्ट पासूनच सुरु करण्यात आली. या ट्रेनच्या प्रवासादरम्यान आतापर्यंत 3 हजार पर्यंत तरुण मुलामुलींनी प्रवास केला आहे. त्यामधील 10 जणांना त्यांच्या आयुष्यातील जोडीदार मिळाला असून त्यांनी लग्नसुद्धा केले आहे. त्यामुळे या ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे ही उत्तमच गोष्ट आहे त्याचसोबत आयुष्यातील जोडीदार शोधण्यासाठी लव्ह स्पेशल ट्रेन आयुष्यात सिंगल असणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणारी असल्याचे या ट्रेनमधील एका प्रवाशाने म्हटले आहे.