चीन (China) येथील काही शहरांमध्ये नाताळ सण साजरी करण्यास बंदी घालण्यास आली आहे.ऐन नाताळच्या दिवशी शॉपिंग सेंटर आणि कार्यालयात करण्यात आलेली रोषणाई सरकारने हटविली आहे.
चीनमध्ये सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी नाताळ साजरा करण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच जिनपिंग हे चीनचे राष्ट्रपती झाल्यापासून पारंपारिक सण साजरे करण्यावर सरकार जास्त लक्ष देत आहे. चीनी परंपरा कायम राहावा याकडे सरकारचा जास्त कल आहे. त्यामुळेच चीनमध्ये नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा सण असल्याने तो साजरा करु नये असा आदेश देण्यात आला आहे.
तसेच काही चीन नागरिकांनी नाताळची खूप उत्साहाने तयारी केली होती. मात्र सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची सक्ती असल्याने त्यांना नाताळ साजरा करण्यात येणार नाही. तर सरकारच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईसुद्धा केली जाणार आहे.