
जगभरात असंख्य लोकांना जोडून ठेवणारी सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट फेसबुक (Facebook) आता लोकांच्या आर्थिक व्यवहारांतही पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, फेसबुक आता डिजिटल करन्सी (Digital Currency) घेऊन येत आहे. लिब्रा ( Facebook Libra Cryptocurrency) असे या करन्सीचे नाव आहे. परंतु, या करन्सीला तज्ज्ञांनीही मोठा आक्षेप नोंदवला आहे. या आधीही डिजिटल करन्सी बिटकॉइन अल्पावधीत लोकप्रिय ठरली होती. मात्र, कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेने मान्यता न दिल्याने या करन्सीत प्रत्यक्ष व्यवहार झाले नाहीत. त्यामुळे ही करन्सी फेल गेल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, चर्चा आहे की, लिब्रा ही करन्सी आपल्या वैशिष्ट्यांमुळे आर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या लोकांना फायदेशीर ठरु शकेल. ही चर्चा असली तरी या करन्सीच्या वैधतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जागतीक बँकेकडूनही या करन्सी व्यवहारातील मुल्य्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. परंतू फेसबुकचे म्हणने असे की, या करन्सीतील गुंतवणूक शून्य असेन.
कोणताही व्यक्ती दुसऱ्या देशात गेला किंवा विदेशातील पैसा एखाद्या व्यक्तिकडे आला तर, तो देश तो पैसा आपल्या चलनात परावर्तीत करुन घेतो. मात्र, या करन्सीमुळे तुम्हाला आपला पैसा इतर चलनात परावर्तीत करण्याची आवश्यकता भासणार नाही. (हेही वाचा, देशातील पहिल्या बिटकॉइन 'एटीएम'ला टाळा; संचालकाची पाठवणी तुरुंगात)
मोबाईल पेमेंटच्या धरतीवरही काम
या करन्सीचा सर्वात मोठा फायदा सांगितला जात आहे तो असा की, ही करन्सी एम पैसा, भीम, मास्टर आणि वीसा कार्ड च्या धरतीवर व्यक्ती ते व्यक्ती पेमेंट करेन. ही करन्सी मोबाईल पेमेंटच्या धरतीवरही काम करेन. त्यासाठी लोकांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.
काय आहे लिब्रा?
लिब्रा ही एक फेसबुकची डिजिटल करन्सी (क्रिप्टो करन्सी) आहे. ही एक सोपी आणि सहज हस्तांतरीत करता येण्यासारखी करन्सी आहे.त्साठी स्थायी पेमेंट नेटवर्क असण्याची गरज नाही. फेसबुक सोबत या करन्सीत अऩेक कंपन्याही जोडल्या गेल्या आहेत.