प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

Berlin: जर्मनीमध्ये एका व्यक्तीने कोविड19 ची लस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट लीक होईल या भीतीने आपल्या संपूर्ण परिवाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच आपली पत्नीचे बनावट लसीकरण सर्टिफिकेट तयार केले होते. त्याला अशी भीती वाटत होती की, हा प्रकार उघडकीस आल्यास परिवाराला वेगळे केले जाईल.(दिलासादायक! कोरोनाचा Omicron व्हेरिएंट 'डेल्टा'पेक्षा जास्त गंभीर नाही; अमेरिकेन शास्त्रज्ञ Fauci यांचा दावा) 

डेली मेलच्या बातमीनुसार, हे प्रकरण बर्लिन मधील दक्षिणेच्या कोएनिग्स वुस्टरहाउजेन येथील आहे. पोलिसांना शनिवारी शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घरातून नवरा-बायको आणि तीन मुलांचे शव ताब्यात घेण्यात आले. मुलांचे वय 10, 8 आणि 3 वर्ष असल्याचे सांगितले गेले आहे.

पोलिसांना घटनास्थळी एक मोठी नोट सुद्धा मिळाली. त्यामध्ये डेविड आर नावाच्या व्यक्तीने लिहिले की, आपली पत्नी लिंडासाठी बनावट लसीकरण सर्टिफिकेट तयार केले होते. तर दांपत्याला भीती वाटत होती की, त्यांना बनावट लसीकरण सर्टिफिकेटमुळे अटक केली जाईल. तसेच त्यांना त्यांच्या मुलांपासून दूर केले जाईल.(South Africa Lockdown: ओमिक्रॉन संसर्गाचा धोका वाढला, दक्षिण अफ्रिकेत एकाच दिवशी रुग्णसंख्या दुप्पट, लॉकडाऊन लावण्याचा निर्णय)

तपासकर्त्यांना असा संशय आहे की, आपली पत्नी आणि मुलींवर त्याने प्रथम गोळ्या झाडल्या, नंतर स्वत:ला सुद्धा गोळी मारत त्याने आत्महत्या केली. पोलिसांना त्यांच्या घरात एक बंदूक सुद्धा मिळाली आहे. परंतु अद्याप स्पष्ट झालेले नाही की, नेमकी गोळी त्याच बंदूकीतून झाडण्यात आली होती. तर मृतदेहांचे शविच्छेदन केले जाणार असून पुढील काही गोष्टींचा उलगडा होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.