
सेलिब्रेटी आणि बिजनेसवूमन अशा दोन्ही भूमिकांमध्ये एकाच वेळी दिसणारी जगप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि मीडिया पर्स्नालिटी काइली जेनर (Kylie Jenner) आपल्या कॉस्मेटिक्स व्यवसायातील 51 टक्के भागिदारी विकरणार आहे. ही भागेदारी ती तब्बल 60 कोटी अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात सुमारे 4320 कोटी रुपये) इतक्या किमतीला कोटी (Beauty company Coty) या कंपनीस विकणार आहे. कोटी न्यूयॉर्क ही कॉस्मेटिक्स फर्म आहे. या कंपनीकडे कवरगर्ल यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असणारे ब्रांड आहेत. कोटीने जेनर हिची कंपनी काइली कॉस्मेटिक्सची किंमत 1.2 अब्ज डॉलर इतकी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी आपल्या पार्टनरशिपची घोषणा सोमवारी केली. या वेळी काइली ब्रांड जगभरात विस्तारीत आणि नव्याने लोकांपुढे आणला जाईल असा दावा दोन्ही कंपन्यांनी केला.
कोटी न्यूयॉर्क ही कंपनी काइली जेनर हिच्या कंपनीसोबतच्या कराराच्या माध्यमातून अनेक रिअॅलिटी टीव्ही स्टार जेनर हिच्या चाहत्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. सोशल मीडियावर जेनर हिचे तब्बल 27 कोटी फॉलोअर्स आहेत. कोटी न्यूयॉर्क सोबतच्या डीलवर जेनर हिने म्हटले की, ही भागिदारी मला आणि माझ्या टीमला प्रत्येक प्रोडक्टच्या क्रिएशन आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत मदतगार ठरेन.

काइली जेनर ही जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीश आहे. तिच्या कंपनीची वार्षिक विक्री गेल्या वर्षी 36 कोटी डॉलर इतकी राहिली. फोर्ब्सने 2018 मध्ये जाहीर केलेल्या यादीत तिचा उल्लेख यंगेस्ट सेल्फ-मेड बिलेनियर असा करण्यात आला होता. या आधी हा विक्रम फेसबुकच्या मार्क जकरबर्ग याच्या नावावर होता. तो 23 व्या वर्षी अब्जाधिश बनला होता. (हेही वाचा, Eveready आता वॉरन बफे यांच्या Duracell कंपनीच्या मालकीची? 1700 कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची चर्चा)

प्राप्त माहितीनुसार, कोटी न्यूयॉर्क यी भागिदारीतून फ्रेगरेंस, कॉस्मेटिक्स आणि स्किनकेयर बिजनेस या माध्यमातून पुढच्या 3 वर्षांपर्यंत 1% पेक्षाही अधिक नफा मिळवण्याचा विचार करत आहे. दरम्यान, दोन्ही कंपनीची अंतिम बोलणी आर्थिक वर्ष 2020 च्या तीसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कॉस्मेटिक्स ब्रांड मधून कोटी न्यूयॉर्ककंपनीला मिळालेला नफा गेल्या वर्षी 17.7 कोटी इतका राहिला आहे.