Bangladesh Chief Justice Obaidul Hassan (Photo Crdeit - X/@rivaan74057)

Bangladesh Chief Justice Resign: बांगलादेशातील (Bangladesh) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन  (Chief Justice Obaidul Hassan) यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. ढाका येथील सर्वोच्च न्यायालयाला शनिवारी आंदोलकांनी घेराव घातला. यानंतर सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांना दुपारी एक वाजेपर्यंत राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारांना सांगितले की, उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि देशभरातील कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या सुरक्षेचा विचार करून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीशही राजीनामा देतील का? असे विचारले असता सरन्यायाधीश म्हणाले, हा त्यांचा निर्णय आहे.

आंदोलकांनी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा दिला होता. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तेथे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे. याठिकाणी पोलिस युनियनने संपाची घोषणा केली असून जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत कामावर परतण्यास नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. (हेही वाचा - Muhammad Yunus to Lead Bangladesh: मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व, आज स्थापणार नवीन अंतरिम सरकार)

बांगलादेशचे नेते मुहम्मद युनूस यांनी धार्मिक ऐक्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांच्या हिंसक मार्गानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. त्यानंतर त्या भारतात आल्या. मीीडिया रिपोर्टनुसार, सध्या त्या नवी दिल्लीत आश्रय घेत असून देशात परत येऊन निवडणुकीत भाग घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा -Bangladesh: पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न BSF ने हाणून पाडला)

बांगलादेशात हिंसक आंदोलकांनी देशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या अनेक घरांची, मंदिरांची तोडफोड केली. अनेक हिंदूना मारहाण करून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तूंची लूट करण्यात आली. तसेच बांगलादेशातील इस्कोन मंदिरातील मूर्तींचीही तोडफोड करण्यात आली आहे.