Train Collision: सोमवारी हैदराबाद जवळ दोन रेल्वेची एकमेकांशी टक्कर होऊन भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना आता बांग्लादेशातही (Bangladesh) दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक (Train Collision) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात बांग्लादेशातील ब्राह्मणबरिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा घडला. या अपघातात 15 जण ठार झाले असून 58 जण जखमी झाले आहेत. उदयन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी प्लॅटफॉर्मकडे येत असताना तिची दुसऱ्या रेल्वेसोबत धडक बसली. यामध्ये दोन कोचचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (हेही वाचा - हैदराबाद येथील काचेगुडा रेल्वे स्टेशनदरम्यान 2 रेल्वेंची एकमेकांना जोरदार धडक, अपघातात 5 जण जखमी)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यांला सुरूवात केली. दरम्यान, जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले की, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक सरकारचे प्रशासक हयात उद दौला यांनी सांगितले की, या घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बांग्लादेश वृत्त संस्थेनुसार, या अपघातात अंदाजे 100 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांची आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
At least 16 people were killed and 58 injured on Nov 12 after a head-on collision between two passenger trains in #Bangladesh's #Brahmanbaria district.
Photo: IANS (File) pic.twitter.com/9EQ1j9FE4a
— IANS Tweets (@ians_india) November 12, 2019
हेही वाचा - बीड: बोलेरो कारची ट्रक मध्ये झालेल्या जोरदार धडकेत 7 जण जागीच ठार
दरम्यान, सोमवारी हैदराबाद जवळ दोन रेल्वेची एकमेकांशी टक्कर होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. हा अपघात काचेगुडा रेल्वे स्टेशनदरम्यान झाला होता. या स्टेशनदरम्यान समोरुन येणारी लोकल रेल्वे एक्सप्रेसला धडकली होती. हा अपघात इतका भीषण होता की, एक्सप्रेस लोकल रेल्वेच्या 3 डब्ब्यात घुसली होती. या अपघातात 5 जण जखमी झाले होते.