आज, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास बीड (Beed) जिल्ह्यातील मांजरसुबा (Manjarsuba)-पाटोदा (Patoda) मार्गावर एक भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजत आहे. यामध्ये बोलेरो कार (Bolero Car) आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये काही ऊसतोड कामगारांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनाची वेगमर्यादा झाली 100 किमी प्रति तास; 18 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू
लोकमत वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, मांजरसुंबा-पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही येथे हा तर उभा होता इतक्यात मागून येऊन बोलेरो कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात बोलेरो मधील सात जण जागीच ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना सध्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नगर-इंदूर महामार्गावर अपघात; खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस पलटी, बसमधील प्रवासी जखमी
दरम्यान, याबाबत सविस्तर वृत्त हाती आलेले नाही मात्र घटना घडताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.