नगर-इंदूर महामार्गावर अपघात; खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस पलटी, बसमधील प्रवासी जखमी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईमधील रस्त्यांबरोबरच राज्यातदेखील रस्त्यांवरील खड्ड्यांत वाढ झाली आहे. नगर-इंदूर महामार्गावर रविवारी पहाटे पुणे-अक्कलकुवा एसटी बसला (Pune Akkalkuwa Bus) मनमाडजवळ अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 15 ते 18 प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले त्यामुळे बस पलटी झाली. (हेही वाचा - मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर बस दरीत कोसळली; 4 जण ठार,30 जखमी)

पुण्याहून अक्कलकुव्वाकडे जाणाऱ्या एसटी बसला नगर-इंदूर महामार्गावर मनमाडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 15 ते 18 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. खड्डे चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा बस पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये 40 प्रवासी होते.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनाची वेगमर्यादा झाली 100 किमी प्रति तास; 18 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनकवाडे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या नगर-मनमाड मार्गावर खड्डयांचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. तसेच सध्या रस्त्यांवर दाट धुके दाटून येत आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.