Kacheguda Station Train Accident (Photo Credits: ANI)

हैदराबाद (Hyderabad) जवळ दोन रेल्वेची एकमेकांशी टक्कर होऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आज सकाळी काचेगुडा रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. या स्टेशनदरम्यान समोरुन येणारी लोकल रेल्वे एक्सप्रेसला धडकली. ही अपघात इतका भीषण होता की, एक्सप्रेस लोकल रेल्वेच्या 3 डब्ब्यात घुसली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी मिळाली नसून 5 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची खबर लागताच जवळपास राहणारे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. जखमींना तेथील रेल्वेमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. यातील लोकल रेल्वे ही MMTS Lingampally-Falaknuma असून दुसरी रेल्वे Kurnool City-Secunderabad Hundry Express आहे असे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा- बीड: बोलेरो कारची ट्रक मध्ये झालेल्या जोरदार धडकेत 7 जण जागीच ठार

रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. या रेल्वे दुर्घटनेची खबर लागताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे पोलिसांनी जखमींवर तात्काळ उपचार म्हणून प्रथमोपचार उपचार केले आहेत. काचेगुडा स्टेशन हैदराबाद शहरातील महत्त्वाचे स्टेशन आहे. सध्या हे स्टेशन भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य रेल्वे च्या नियंत्रणाखाली आहे.