Ayodhya's Ram Mandir Inauguration (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील प्रत्येक नागरिक सध्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची (Ram Temple 'Pran Pratishtha' Ceremony) वाट पाहत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. आता परदेशात राहणाऱ्या भारतीयांनीही यासाठी विशेष तयारी सुरू केली आहे. भारतीय-अमेरिकन लोक अमेरिकेमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत. या सोहळ्यासाठी अमेरिकेत कार रॅली (Car Rallies) आयोजित करण्याची योजना आहे.

कॅलिफोर्निया इंडियन्स ग्रुप 20 जानेवारी रोजी ‘भगवान श्री राम जी यांची घरवापसी’ साजरा करण्यासाठी विशेष कार रॅलीचे आयोजन करत आहे. आयोजकांनी सांगितले की रॅलीमध्ये 400 हून अधिक कार सहभागी होतील, जी दक्षिण खाडीपासून प्रतिष्ठित गोल्डन गेट ब्रिजपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

आयोजकांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद कार्यक्रम साजरा करण्यासाठी उत्तर कॅलिफोर्नियातील भारतीय एकत्र येत आहेत.’ यासाठी 22 जानेवारीपर्यंत विशेष सोहळे आयोजित करण्याची यूएसमधील स्थानिक मंदिरे आणि डायस्पोरा संघटनांची योजना आहे. अनेक आठवड्यांपासून वॉशिंग्टन, शिकागो आणि इतर अमेरिकन शहरांमध्ये कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Ram Temple 'Pran Pratishtha' Ceremony: उत्तर प्रदेशमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन दिवशी सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद, दारूविक्रीही बंद; CM Yogi Adityanath यांची घोषणा)

आयोजकांनी सांगितले की, ते अयोध्येला जाऊ शकत नाही पण रामजी आमच्या हृदयात आहेत आणि त्यांच्या घरवापसीसाठी आम्ही आमचे छोटेसे योगदान देत आहोत. दुसरीकडे 22 जानेवारीला अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर राम मंदिराचा अभिषेक सोहळा थेट स्क्रिनिंग होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर भारतीय कार्यक्रमाचे लाईव्ह स्क्रीनिंग होणार आहे. याआधी भारताने टाइम्स स्क्वेअरवर सहा मोठ्या कार्यक्रमांचे स्क्रीनिंग केले आहे.